धामणगाव धाड, १९ नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : सार्वजनिक निवडणुक संबंधाने आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या काळात सोशल मीडिया प्रसार माध्यमावर आक्षपार्ह जातीवाचक मजकूर किंवा धार्मिक भावना दुखावल्या जातील, अशी पोस्ट टाकून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा धाड पोलिस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी दिला आहे. राज्यात विधानसभेकरिता २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्याप ासून निवडणुकीचे वातावरण तापले आहे. एकमेकांवर आरोपांची राळ उडविण्यात येत आहे. कार्यकर्त सोशल मीडियावर आक्रमक होत असून काहीजण भान न ठेवता पोस्ट करत आहेत. ज्यामुळे कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सोशल मीडियावर उमेदवाराबाबत आक्षेपार्ह बदनामीकारक तसेच राजकीय व धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकू नये, तसे केल्यास कार्यकर्त्यावर कारवाई होईलच. शिवाय संबधित गृपचा अॅडमिनही अडचणीत येऊ शकतो. त्यामुळे भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम ३३ नूसार उमेदवार किंवा निवडणूक प्रक्रियेसंदर्भात आक्षेपार्ह संदेश, छायाचित्र, खोट्या बातम्या, अफवा, खोटी माहिती, सोशल मीडियावर प्रसारित होत असल्याचे निर्दशनास आल्यास त्याबाबतची माहिती पोलीस प्रशासनास द्यावी, असे आवाहन धाड पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरेंद्र पेंदोर यांनी नागरिकांना केले आहे.