निसटत्या विजयाने उद्विग्न आ.गायकवाड यांची जाहीरपणे खंत
बुलढाणा, 29 नोव्हेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : विधानसभा निवडणूकीत आ.संजय गायकवाड यांचा निसटता विजय झाल्यामुळे त्यांनी खंत व्यक्त केली आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघात 2019 मध्ये आमदार झाल्यनंतर मोठा सत्तासंघर्ष झाला. ते होत नाही तर लगेच कोरोना महामारी आली. यामध्ये सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाळ गेला. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे असतांना सुध्दा आ.संजय गायकवाड यंानी विकासाची कामे आण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर जून 2022 मध्ये एकनाथराव शिंदे यांनी भाजप बरोबर जाण्याचा निर्णय घेत शिवसेनेच्या इतिहासात सर्वात मोठा राजकीय भुकंप घडवून आणला. मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे झाल्यानंतर आ.संजय गायकवाड यांनी हजारो कोटीचे कामे बुलढाणा विधानसभा मतदारसंघात आणले. बुलढाणा शहराच्या सौंदर्यात भर पाडण्यासाठी विविध विकासाची कामे केली. विविध महापुरूषांचे पुतळे, तलवाचे सौदर्यीकरण यासारखे विविध कामे केली. त्यामुळे सहाजिकच बुलढाणा विधानसभा मतदारसंघात चांगले मताधिक्य मिळणे अपेक्षित होते. परंतू ते न मिळता त्यांना शेवटच्या फेरीपर्यंत विजयासाठी थांबावे लागले. बुलढाणा शहरातील गजानन महाराज मंदिर परिसरात आ.गायकवाड यांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी बोलतांना सांगितले की, जीवाचे रान करून एकाएका मतासाठी भीक मागावे लागत असेल तर या लोकशाहीवरील विश्वासच उडाला. कार्यकर्त्यांना सांगितले की काही कामे करून फायदा नाही. 40 हजार लोकांना रक्त दिले, रोज किती तरी लोकांच्या आरेग्याबाबत समस्या सोडवितो पण या शहराने आपल्याला दिले तरी काय ? एक हजार कोटीची विकास कामे या शहरासाठी केले. राज्यात हे शहर चमकायला लागले. तरी पण बुलढाण्याच्या लोकांना वाटले नाही की या माणसाला ताकद दिली पाहिजे. दारू, मटन आणि पैसा या निवडणूकीत पाहिले. समजा जर दुर्दैवाने पराभव झाला असता तर काय झाले असते ? आज सरकार वर नाही सगळीकडे अंधाधुंद कारभार झाला असता. सगळ्या योजना बंद पडल्या असत्या. विकास कामे करून जर पैश्याच्या भरवश्यावर निवडणूका लढल्या जात असल्याने कार्यकर्ता म्हणून खंत वाटते. एवढे विकास कामे करून चोविस तास काम करून जर लोकांपुढे झिजावे लागत असेल तर आमदार की यापुढे लढावी की न लढावी हा प्रश्न निर्माण झाला आहे. भविष्यामध्ये हा शेवटचा कार्यकाळ म्हणून पाच वर्ष काम करणार आहे. लोकांना घाणेरडं राजकारण पाहिजे, लोकांना विकास नको, सौंदर्यीकरण नको लोकं जर दारू पैसे पाहिजे असेल तर लोकांचे प्रतिनिधीत्व करावे तरी कशासाठी ? असा प्रश्न निर्माण झाल्याचे आ.संजय गायकवाड यांनी यावेळी सांगितले.