आ.संचेती, आ.कुटे, आ. महाले यांनी ही घेतली आमदारकीची शपथ
बुलढाणा, ७ डिसेंबर (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आमदार संजय गायकवाड यांनी दुसऱ्यांदा शपथ घेतली. बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे दुसऱ्यांदा प्रतिनिधित्व करणार आहेत. आज महाराष्ट्र विधीमंडळात नवनिर्वाचित आमदारांचा शपथ्विधी पार पडला. आ. संजय गायकवाड यांनी शपथ घेत असताना सर्वप्रथम आई तुळजाभवानी, माँसाहेब जिजाऊ, जाणताराजा छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज, बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, एकनाथराव शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वंदन करून आ. गायकवाड यांनी शपथ घेतली. परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव न घेतल्याने चर्चांना उधाण आले होते. याबाबत गुड इव्हिनिंग सिटीने रिल्समधून न्यूज पण दिली खरे कारण काय, याचा खुलासा स्वतः आ. गायकवाड यांनी केला आहे. शपथविधी आटोपल्याबरोबर त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीशी संपर्क करून सांगितले की, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सभागृहात उप- स्थित नसल्यामुळे नाव घेतले नाही. परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या बदल नेहमीच मनात आदराची भावना असल्याचे आ. संजय गायकवाड यांनी सांगितले. त्यामुळे कुणीही कुठलाही गैरसमज करू नये, असेही त्यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून कळविले आहे. मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार चैनसुख संचेती यांनी सहाव्यांदा आमदारकीची शपथ घेतली आहे. भाजपचे डॉ. संजय कुटे हे सलग पाच वेळा जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघातून विजयी झाले. डॉ. कुटे यांनी आज पाचव्यांदा आमदारकीची शपथ घेतली. तर चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांनी दुसऱ्यांदा आमदारकीची शपथ घेतील आहे. त्या चिखली विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा विजयी झाल्या आहे.