spot_img

पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडसर; पत्नीने पतीला जाळले

बुलढाणा, 14 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडसर आल्याने पत्नीने पतीला अंगावर पेट्रोल टाकून जाळले. या प्रकरणी बुलढाणा शहर पोलिस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रणधीर हिम्मत गवई रा.पाचला ता.मेहकर यांनी बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी लता रणधीर गवई रा.तार कॉलीनी सुंदरखेड येथे 13 जानेवारी रोजी रात्री 2 वाजता अंगावर पेट्रोल टाकुन जाळण्याचा प्रयत्न केला. शेजारील लोकांनी रणधीर गवई यांच्या अंगावर पाणी टाकुन आग विझवली. थोड्यावेळात तेथे पोलीस आले त्यांनी रणधीर गवई यांना जिल्हा सामान्य रूग्णालय येथे दाखल केले होते. परंतू त्यांना पुढील उपचारासाठी बुलढाणा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये भरती करण्यात आले आहे. लता गवई हीच्या अनैतिक संबध असल्याच्या कारणवरून पेट्रोल टाकून माचीसच्या काडीने आग लावून पेटवून दिले आहे  असे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी लता गवई यांच्यावर बुलढाणा शहर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत