spot_img

दाभाडी प्रकरणाची उकल काही तासातच ! पोलिसांनी डॉक्टरला घेतले ताब्यात

  1. बुलढाणा, 29 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत) : दाभाडी दरोडा प्रकरणाचा पहिल्या तासाभरातच पोलिसांना उलगडा झाला होता. पण डॉक्टर हॉस्पिटलमध्ये भरती असल्यामुळे पोलिसांना बरीच कळ सोसावी लागली आहे. अखेर दहाव्या दिवशी दाभाडी प्रकरण म्हणजे दरोडा नसून दरोड्याचा बनाव असल्याचे स्पष्ट होत आहे. बोराखेडी पोलिसांनी पशुवैद्यकीय चिकित्सक डॉक्टर गजानन टेकाडे यास ताब्यात घेतले आहे. अर्थात या प्रकरणात कोणाला अटक केली आहे की नाही हे सांगण्यास मात्र पोलीस कमालीची गुप्तता पाळत आहे. विशेष म्हणजे गुड इव्हिनिंग सिटीने मागील 23 जानेवारी रोजी या प्रकरणाला धक्कादायक कलाटणी मिळणार असल्याचे यापूर्वीच आपल्या बातमीमधून सगळ्यांसमोर आणले होते आणि हे वृत्त गुड इव्हिनिंग सिटीच्या वेबसाईटवर 25 हजार पेक्षा जास्त वाचकांनी बघितले आहे.

गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार दाभाडी प्रकरणाला घेऊन बोराखेडी पोलिसांनी डॉक्टर गजानन टेकाळे यांस मागील काही तासापासून ताब्यात घेऊन त्यांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. अद्याप पर्यंत कोणालाच अटक नाही. डॉक्टर कडून काय काय माहिती मिळते याकडे मात्र सर्वांचेच लक्ष लागले आहे. वरिष्ठांच्या आदेशामुळे पोलिसांनी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. तरीही सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुढील काही तासांमध्ये दाभाडी प्रकरणाची उकल होऊन “खूनी” गजाआड असेल.

*अशी झाली होती घटना…

मोताळा-मलकापूर या नॅशनल हायवेवर दाताळा रोडवर दाभाडी गांव आहे. या गावच्या बसस्टॅण्डवर पशुवैद्यकीय डॉ. गजानन टेकाळे यांचे दुमजली घर आहे. पत्नी आणि कन्येसोबत डॉ. टेकाडे राहतात. 19 जानेवारीच्या पहाटे 5 वाजता डॉ. गजानन टेकाडे (टेकाळे नाही ) त्यांच्याच घरी बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांची पत्नी गतप्राण झालेली होती. सुदैवाने, घरी मुलगी नव्हती. कारण घरातील स्थिती सांगत होती की, दरोडा पडला आहे. मृतक सौ. माधुरी टेकाडे यांच्या गळ्यातील मंगळसुत्र गायब होते. कपाट फोडलेले होते. कपडे विखुरलेले तर डॉक्टरही मार लागून कोमात असल्यासारखे होते. डॉक्टरच बेशुद्ध होते.. ते काहीच बोलू शकत नव्हते. पण पाहणारेच म्हणत होते की, दरोडा पडला आहे. दरोडेखोरांनी टेकाळे दांपत्याशी झटापट केली आणि या झटापटीत सौ. माधुरी टेकाळे यांचा जीव गेला. दरोडेखोर लूटमार करून पळून गेले, अशा प्रकारच्या बातम्याही सर्व पत्रकारांनी ‌‘ब्रेकींग‌’ केल्या. त्यात गुड इव्हिनिंग सिटी नेहमीप्रमाणे आघाडीवर होते. हायवेवर घर असल्यामुळे दरोडेखोरांचे पळून जाण्यासाठी चांगलेच फावले, अशीही नाकारता न येण्यासारखी चर्चा समोर आली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेवून आमदार संजय गायकवाड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जिल्हा पोलिस अधीक्षक विश्व पानसरे पोहोचले. अप्पर पोलिस अधीक्षक, डीवायएसपी, एलसीबी प्रमुख दाभाडीत ठाण मांडून बसले. डॉग यूनिट आणले गेले. फिंगर प्रिंट एक्स्पर्ट दरोडेखोरांच्या बोटांची ठसे गोळा करण्यासाठी जीवाची बाजी लावत होते. तीन ते चार पथके तपासकामात गुंतली होती. पण जाणकार पोलीस अधिकाऱ्यांना कळून चुकले होते की, यामागे वेगळेच कटकारस्थान आहे.

 

◾मोबाईलने उघडले काही रहस्य

पोलिसांनी पहिल्याच दिवशी डॉक्टरचा मोबाईल ताब्यात घेतला होता. ह्या मोबाईलने सगळे राज उकलले. डॉक्टरचे आगळे वेगळे फोटो आणि काही व्हिडिओ मोबाईलमध्ये आढळल्याचे समजते.

दाभाडी प्रकरण म्हणजे ‌‘घर का भेदी लंका ढाये‌’, असे आहे. दाभाडी प्रकरण म्हणजे दाल में काला नाही तर पूर्ण दाळच काळी आहे. याला तूटलेल्या नात्यांची किनार आहे.. विद्वत्तेच्या बुडाखाली अंधार आहे… भावनांचा चित्कार आहे, जो डोळे विस्फारणारा आहे, या शब्दांत गुड इव्हिनिंग सिटीने वाचकांना वेगवेगळे क्लू दिले होते. आणि याच वृत्तामध्ये आम्ही सांगितले होते की, दाभाडी प्रकरण म्हणजे एक मोठा गौप्यस्फोट आहे. फक्त काही तास थांबावे लागेल आणि पोलिसच यासंदर्भात अधिकृत माहिती प्रसारित करतील

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत