spot_img

भारतीय जैन संघटनेकडून आनंद मेळाव्याचे आयोजन

बुलढाणा, 30 जानेवारी (गुड इव्हिनिंग सिटी) ः भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेच्या वतीने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. उद्योगिनी मेळा हा महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहित करण्यासाठी  भारतीय जैन संघटनेच्या महिला शाखेने आयोजित केला आहे. या माध्यमातून महिला सशक्तिकरणास चालना मिळणार आहे.
बुलढाणा येथील रेणुका मंगल कार्यालय येथे दिनांक 31 जानेवारी ते 1 फेब्रुवारी दरम्यान सकाळी 11 ते रात्री 10 वाजेपर्यंत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात ज्वेलरी, मुखवास, खान खजाना, ड्रेस, चप्पल बूट व इतर साहित्य विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. स्वाद आणि शॉपिंग चा आनंद या मेळ्यात घेता येणार आहे. तरी यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन सौ.शिल्पा बुरड, सौ.वर्षा जैन, भारतीय जैन संघटना परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत