spot_img

बुलढाण्यात प्रथमच भव्य ‘दिवाळी शॉपिंग एक्झिबिशन २०२६’; ३१ ऑक्टोबरपासून तीन दिवसांची खरेदीची पर्वणी!

बुलढाणा : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर बुलढाणेकरांसाठी यंदा खरेदीची एक खास पर्वणी उपलब्ध होणार आहे. सखी नेटवर्क, बुलढाणा यांच्या वतीने प्रथमच भव्य ‘दिवाळी शॉपिंग एक्झिबिशन २०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. ही प्रदर्शनाची पर्वणी ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत वारीकरी भवन, सर्क्युलर रोड, धान्य मार्केटजवळ, बुलढाणा येथे आयोजित करण्यात आली आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन दिवाळीच्या खरेदीला आकर्षक आणि नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने करण्यात येत आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे.

या प्रदर्शनात साड्या, फॅशन, ज्वेलरी, होम डेकोर, गिफ्ट्स, कपडे, कॉस्मेटिक्स, हँडीक्राफ्ट्स, दिवाळी फराळ व खाद्यपदार्थ, वेलनेस, आयुर्वेदिक उत्पादने अशा विविध प्रकारच्या वस्तूंचे स्टॉल एकाच छताखाली उपलब्ध असणार आहेत.

विशेष म्हणजे या प्रदर्शनात ५० पेक्षा अधिक स्टॉल्स सहभागी होणार असून, ग्राहकांना विविध प्रकारच्या वस्तूंची खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. दिवाळीच्या खरेदीसोबतच आपल्या कुटुंबीयांसाठी आकर्षक भेटवस्तू निवडण्याची संधीही यानिमित्ताने मिळणार आहे.

स्थानिक व्यावसायिक, महिला उद्योजिका, हस्तकला व्यावसायिक आणि विविध क्षेत्रांतील विक्रेत्यांना आपल्या उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा महत्त्वाचा उद्देश आहे.

सौं.राजमती विवेक ठेंग व आनंद समाधान जाधव (संस्थापक, सखी नेटवर्क) यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध क्षेत्रांतील मान्यवरांचे मार्गदर्शन व सहकार्य या उपक्रमाला लाभत आहे.

बुलढाणेकरांनी आपल्या कुटुंबीयांसह या भव्य दिवाळी शॉपिंग एक्झिबिशनला भेट देऊन खरेदीचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

स्थळ : वारकरी भवन, सर्क्युलर रोड, धान्य मार्केटजवळ, बुलढाणा.

दिनांक : ३१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२६

वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

सौं. राजमती विवेक ठेंग
ठेंग क्लासेस, जिजामाता नगर, शिक्षक कॉलनी, बुलडाणा.
मोबाईल no–9260049421

 

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत