बुलढाणा, 7 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : राज्यात जि प अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या दीर्घ कालावधीपासून प्रलंबित मागण्याकडे शासन पातळीवर हेतूत: दुर्लक्ष होत असल्याने येत्या दिनांक 10 मार्च रोजी सोमवारी राज्याध्यक्ष बलराज मगर व कार्याध्यक्ष बाबुराव पुजरवाड यांच्या आदेशाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदेसमोर महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन (ओंकार) तर्फे दिवसभर काळ्याफिती लावून निदर्शने तसेच घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद बुलढाणा समोर सुद्धा सोमवारी कर्मचारी युनियनच्या वतीने घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे. तशा आशयाचे निवेदन जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी(सामान्य ) आशिष पवार यांना जि प कर्मचारी युनियन जिल्हा शाखा बुलढाणा तर्फे देण्यात आले यावेळी युनियनचे अध्यक्ष राजेश वाईन देशकर, प्रदेश उपाध्यक्ष विजय तांदूळकर,सचिव अनिल सुसर, सौ.पी एस् गायकवाड महादेव सोनवणे, राजेश चव्हाण केशव वाघ,अश्विनी वाकतकर ज्योती धुंदळे,कृष्णा आढाव, सौ.राधा उबरहंडे इत्यादींची उपस्थिती होती.