बुलढाणा, 9 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा शहरातील मधुकर किसन तायडे यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘बापलेकांच्या कविता’ चे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिध्द कवी तुळशीराम मापारी व गझलकार गोपाल मापारी या बापलेकांच्या कवितांचे आयोजन करण्यात आले आहे. आज रविवार दिनांक 9 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता मयुरकुंज निकम हॉस्पिटल समोर, जांभरून रोड बुलढाणा येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला डॉ.गणेश गायकवाड प्रसिध्द शायर गझलकार, अरविंद टाकळकर संचालक स्वरसाधना संगीत विद्यालय, बुलढाणा यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वैशाली तायडे, दिलीप तायडे, अशोक तायडे, धनश्री तायडे यांनी केले आहे.