spot_img

मोताळ्याचा नायब तहसीलदार रावळकर अँटी करप्शन ब्युरोच्या ताब्यात

बुलढाणा, 10 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : गौण खनिजाची परवानगीचा टेबल असलेल्या मोताळ्याचा नायब तहसीलदार कौतिकराव रावळकर यांना आज अँटीकरप्शन ब्युरोच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. मुरमाच्या गाडीच्या परवानगीसाठी 14 हजार रुपये लाचेची मागणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. आज दुपारच्या सुमारास ही कारवाई मोताळा तहसील कार्यालयात झाली. त्यानंतर प्रशासनामध्ये एकच खळबळ उडाली. तक्रारदार नांदुऱ्याचा असल्याचे कळते. तक्रारदाराचा मातीचा ट्रक रावळकर याने पकडला होता. तू सोडून देण्यासाठी चार हजार रुपये आणि हप्ता म्हणून दहा हजार रुपये, अशी मागणी रावळकरची होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मागील महिन्यातच रावळकरला अँटी करप्शन ब्युरोने आपल्या जाळ्यात उडण्याचा प्रयत्न केला होता परंतु संशय आल्यामुळे रावळ करणे तक्रारदाराकडून पैसे स्वीकारले नव्हते. “माझ्याकडे नको, माझ्या माणसाकडे द्या”, असा निरोप रावळकरचा होता. अर्थात रावळकर रंगेहात पकडला गेला नसला तरी त्याच्या विरोधात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचेची मागणी करण्याला सुद्धा त्याच कलम आहेत, ज्या रांगेहाथ पकडल्यानंतर दाखल होतात. रावळकर ला एसीबीच्या पथकाने बोराखेडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. त्या ठिकाणी रावळकर विरोधात कायदेशीर कार्यवाहीची प्रक्रिया सुरू आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत