spot_img

धामणगाव धाडच्या भोंदू बाबाने नरबळीसाठी खोदला होता 20 फुटांचा खड्डा !

◾ पाच वर्षीय ईश्वरीचा देणार होता बळी!
◾ खड्ड्याचा फोटो पाहून तुम्हीही व्हाल अवाक

बुलढाणा, 11 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी/अजय काकडे) : बुलढाणा तालुक्यातील धामणगाव धाड येथे एक जुने घर आहे.. ते घर शापित असल्याची गावात चर्चा आहे… तिथे कोणी राहत ही नाही मात्र या घरात मोठे गुप्त धन आहे अशी माहिती भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला मिळाली होती.. त्यावरूनच त्याने ते काही दिवसापूर्वी विकत घेतले होते व त्या घरात गुप्तधन काढण्यासाठी या खड्ड्यात पाच वर्षीय ईश्वरीचा नरबळी देणार होता, अशी धक्कादायक माहिती आरोपी लोखंडे याच्याकडून पोलिसांना मिळाली आहे. गणेश लोखंडेने एकट्यानेच विविध तंत्र मंत्र विद्या वापरून व मोठा खड्डा करून प्रयत्न सुरू केले होते मात्र त्याला आत्महत्या प्रकरणात अटक झाल्यामुळे त्याचा डाव फसला व त्याची तुरुंगात रवानगी झाली.

भोकरदन पोलीस ठाण्यात अटक असलेला भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याचा पोलीस कोठडीमध्ये असताना पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके यांनी पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सखोल तपास केला, त्यात आरोपी चे धामणगाव येथे असलेले एक जुन्या घराची झडती घेतली असता त्यात एक दोन बाय तीनचा वीस फूट खोल खड्डा केलेला आढळून आला या खड्ड्यातच नरबळी देण्याचा त्याचा हेतू होता हा धक्कादायक खुलासा झाला आहे. भोकरदन तालुक्यातील वालसा वडाळा येथील ज्ञानेश्वर भिका आहेर वय 30 वर्ष यांनी त्यांच्या स्वतःच्या शेतात एका लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती दिनांक ३ मार्च रोजी या प्रकरणात भोकरदन पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा तपास भोकरदन पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक राकेश नेटके हे करीत होते.

पोलीस तपासामध्ये मृताच्या कपड्याच्या खिशात एक चिठ्ठी मिळून आली होती व त्यात धामणगाव तालुका बुलढाणा येथील भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याने दिलेल्या मानसिक त्रासातूनच ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्या केली होती अशी माहिती समोर आली यावरून भोकरदन पोलिसांनी तात्काळ गणेश दामोदर लोखंडे यास धामणगाव येथून अटक केली होती व त्यास भोकरदन न्यायालयासमोर हजर केल्यानंतर न्यायालयाने त्याला दिनांक 10 मार्चपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले होते या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर गणेश दामोदर लोखंडे यांच्या जबाबातून खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यांनी तपासात पोलिसांना कबुली जबाब दिला असून गुन्ह्यातील घटनास्थळी पोलिसांनी पंचनामे करून पुरावे ही हस्तगत केले आहे या प्रकरणाची अधिक माहिती अशी की धामणगाव तालुका बुलढाणा येथील एका जुन्या घरात मोठे गुप्त धन आहे ते धन काढण्यासाठी नरबळी द्यावा लागतो असे भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याला त्याच्या मंत्र साधना व तंत्रातून माहिती मिळाली होती त्या दृष्टीने त्याने तयारीही सुरू केली होती दोन ते तीन वर्षापासून त्याच्या संपर्कात असलेले व त्याचे भक्त झालेले व नेहमी धामणगाव येथील श्याम बाबा यांच्या दर्शनासाठी मंदिरात येत असणारे ज्ञानेश्वर भिका आहेर व त्यांची पत्नी यांच्याशी त्यांची चांगली ओळख झाली होती त्यात संबंधातून त्याने त्यांना असलेल्या मुलीची ही माहिती मिळवून घेतली होती त्यांची पाच वर्षाची मुलगी ही पायाळू जन्मली आहे असे त्याला माहीत होते व गुप्तधन काढण्यासाठी ज्ञानेश्वर आहेर यांची पाच वर्षीय मुलगी ईश्वरी ही गणेश लोखंडे याला नरबळी देण्यासाठी लागत होती त्याने ज्ञानेश्वर आहेर यांना व त्यांच्या पत्नीला ईश्वरी नामक मुलगी माझीच आहे ती मला वापस द्या, असे म्हणून पत्र व्यवहारी सुरू केले होते काही दिवसापूर्वी तर त्याने एका वकिलामार्फत ज्ञानेश्वर आहेर यांना मानहानीची नोटीसही बजावली होती त्यामुळे ज्ञानेश्वर आहेर हे कुटुंबीय मानसिक तणावात होते त्यातूनच पुढे ज्ञानेश्वर आहेर यांनी आत्महत्याही केली भोंदू बाबा गणेश लोखंडे याने काही दिवसांपूर्वी धामणगाव येथे एक गावात चर्चा असलेले शापित व जुने घर तेथे मोठे धन असल्याच्या लालसेने विकत घेतले होते व तेथील गुप्तधन काढण्यासाठी त्यांनी गेल्याा दीड वर्षापासून एकट्यानेच एक इलेक्ट्रिक ब्रेकर घेतले होते व त्याच्या साह्याने त्याने त्या जुन्या घरात दोन बाय तीन चा वीस फूट खोल खड्डा ही करून ठेवला पोलीस तपासामध्ये हे सर्व मिळून आले पोलिसांनी त्या घराची झडती घेतली असता त्यांना तेथे एक गोरख तंत्र नावाचे पुस्तकही मिळून आले हे सर्व आपण गुप्तधन मिळविण्यासाठी व त्या करिता नरबळी द्यावा लागतो म्हणून ज्ञानेश्वर आहेर यांची मुलगी मिळविण्यासाठीच प्रयत्न करत होतो अशी धक्कादायक माहिती सांगितले आहे. या प्रकरणाचे तपास अधिकारी राकेश नेटके यांनी सांगितले की भोंदू बाबा गणेश दामोदर लोखंडे याची पोलीस कोठडी तील मुदत संपल्यानंतर त्याला भोकरदन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे त्यावरून त्याची आता जालना कारागृहात रवानगी झाली आहे. पोलीस झडतीमध्ये घटनास्थळी पोलिसांना खड्डा करण्यासाठी वापरलेले इलेक्ट्रिक ब्रेकर वायर व एक तंत्र साधनेचे गोरख तंत्र नावाचे पुस्तकही मिळून आले आहे

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत