बुलढाणा, 21 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) ः सध्याच्या धकाधकीच्या जीवनात जे डॉक्टर सर्वांना आरोग्य सेवा प्रदान करतात त्याच डॉक्टरांना सद्य परिस्थितीच्या कार्यशैलीमुळे प्रचंड ताणतणावाचा सामना करावा लागतोय. डॉक्टर जे समाजा च्या आरोग्य सेवेचा कणा आहे ह्याच डॉक्टरांसाठी त्यांच्या सर्वांगीण आरोग्य प्रति दायित्व म्हणून ब्रह्मकुमारीज मेडिकल विंग व वसंतप्रभा आरोग्य सेवा प्रतिष्ठान बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 23 मार्च 2025 रोजी सकाळी 8 वाजता माईंड बॉडी कॉन्फरन्स चे भव्य आयोजन करण्यात आले आहे.
प्रजापिता ब्रह्मकुमारीच ईश्वरिय विश्वविद्यालय ह्या जागतिक प्रतिष्ठाप्राप्त संस्थेच्या मेडिकल विंग द्वारे बुलढाणा जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आरोग्य सेवा देणार्या डॉक्टरांसाठी आयोजित केलेल्या माईंड बॉडी कॉन्फरन्स या कार्यक्रमाला स्वउन्नती , आरोग्य सेवेच्या गुणवत्तेची वृद्धी व डॉक्टर्स रुग्ण यामधील नातेसंबंधातील सुदृढता या उद्देशाने डॉक्टरांसाठी ह्या माईंड बॉडी कॉन्फरन्सचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रमास आरोग्य क्षेत्रातील ऍलोपॅथी, डेंटल, आयुर्वेदा, होमिओपॅथी, योगा नॅचरोपॅथी, युनानी आणि फिजिओथेरपी इत्यादी प्रकारातील डॉक्टर सहभागी होणार आहेत. या कॉन्फरन्ससाठी मुंबई येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. रतन राठोड नाशिक येथील प्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट डॉ. राजेश जावळे व अकोला येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ. श्रद्धा उगले या मान्यवरांचे मार्गदर्शन लावणार आहे. बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अमोल गीते जिल्हा परिषद बुलढाणा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सर्व आरोग्य सेवा देणार्या डॉक्टरांना ब्रह्मकुमारीसर्फे बीके उर्मिला दीदी व वसंत प्रभा सेवा प्रतिष्ठान बुलढाणा तर्फे डॉ.शोन चिंचोले (प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ, बुलढाणा) यांनी जास्तीत जास्त रजिस्ट्रेशन करून उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना करण्यात आले आहे.