spot_img

जन्मदात्यानेच घेतला पोराचा जीव !

न्यायालयाने ठोठावली जन्मठेपेची शिक्षा

बुलढाणा, 25 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : जन्मदात्या पित्याने पोटच्या पोराच्या डोक्यात लोखंडी रॉड मारून खुन केल्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनवण्यात आली आहे. आज दिनांक 25 मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश सागर मुंगीलवार सत्र न्यायालय मेहकर यांनी हा निर्णय दिला आहे. आरोपी माणिक केशव राठोड रा.पारडी ता.मेहकर हा पत्नी व मुलगा रवी राठोड यांच्यापासून वेगळा राहत होता. कारण त्यांच्यामध्ये नेहमीच वाद होत असत. असे असतांना आरोपी माणिक राठोड याची मोटारसायकल मुलगा रवी हा वापरत होता. पण रवीने त्याच्या वडीलांना न विचारता मोटारसायकल ही परस्पर गहाण ठेवली होती. मोटारसायकल गहाण ठेवल्याच्या कारणावरून  नेहमी बापलेकांमध्ये वाद होत होते. मोटारसायकलचा वाद इतका विकोपाला गेला की माणिक राठोड यांने 20 ऑक्टोबर 2020 रोजी सायंकाळी 6 वाजता उमेश दशरथ पवार रा.पारडी ता.मेहकर यांच्या घराजवळ लोखंडी रॉड रवीच्या डोक्यात मारला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने रवीचा यामध्ये मृत्यू झाला होता. सदरची घटना आरोपीच्या सुन हिनी पाहली होती. याप्रकरणी माणिक राठोड याच्या विरूध्द दुसरा मुलगा व मृतक रवीचा भाऊ मंगेश माणिक राठोड यांने जानेफळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. त्यानुसार माणिक राठोड याच्यावर कलम 302 भांदवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक दिपक मसराम यांच्याकडे देण्यात आला होता. त्यांनी तपास पुर्ण करून आरोपी विरूध्द दोषारोप पत्र न्यायालयामध्ये दाखल केले. त्यानंतर सदरचे प्रकरण हे सरकारी वकील पोकळे यांनी चालविले. यामध्ये सात साक्षीदार तपासले. त्यानंतर अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश-2 मेहकर सागर मुंगीलवार यांनी आरोपी विरूध्द गुन्हा सिध्द होत  असल्याचे नमुद केले. त्यावेळी आरोपीच्या शिक्षेकरीता विशेष सरकारी वकील अ‍ॅड.एस एम खत्री यांनी प्रखर युक्तीवाद केला. एकंदरीत पुरावे युक्तीवादावरून आज 25 मार्च रोजी या प्रकरणाचा निकाल मेहकर न्यायालयाने दिला आहे. यामध्ये माणिक राठोड याला जन्मठेपेची शिक्षा व 10 हजार रूपये दंड न भरल्यास 3 महिने कैदेची शिक्षा  ठोठविण्यात आली आहे.
सदर प्रकरणामध्ये सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अ‍ॅड.पोकळे व विशेष सरकारी वकील अ‍ॅड. एस एम खत्री यांनी कामकाज केले. त्यांना कोर्ट पैरवी म्हणून एएसआय छाया हिवाळे सहकार्य केले..

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत