बुलढाणा, 26 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : चैत्र पाडवा पहाट निमित्त प्रभाती सूर नभी रंगती..चे आयोजन करण्यात आले आहे. बुलढाणा येथे दरवर्षी गुडीपाडव्याच्या दिवशी चैत्र पाडवा पहाट निमित्त संगीताचा कार्यक्रम आयोजित केला जातो. यावर्षी सुध्दा गुडीपाडव्याच्या दिवशी प्रभाती सूर नभी रंगती या कार्यक्रमाचे आयोजन रविवार, दिनांक 30 मार्च 2025 रोजी सकाळी 5.30 वाजता एडेड हायस्कूल बुलढाणा येथे आयोजित केला आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रसिध्द गीतकार राजेश दुतंडे व वाचस्पती चंदेल यांच्या भक्तीगी, भावगीत, अभंग व चित्रपट संगीताची दर्जेदार मैफल रंगणार आहे. सदरचा कार्यक्रम नियोजित वेळेवर सुरू होईल. तरी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन वसंतलक्षमी एज्युकेशन अँड मल्टीपर्पज फाऊंडेशन व बुलढाणा मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.