बुलढाणा, 29 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील 113 वर्षे पुरातन श्रीराम मारूती मंदिर येथे दरवर्षी अनेक धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात. यामध्ये रविवार प.पू.ब्रम्हचैतन्य महाराजांची उपासना तर गुरूवारी प.पू.प्रल्हाद महाराजांची उपासना यासह असे अनेक कार्यक्रम आयोजित केले जातात.
श्रीराम मारूती मंदिर कारंजा चौक येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील रविवार 30 मार्च ते रविवार 13 मार्चपर्यंत गुडीपाडवा, श्रीराम व श्री हनुमान जन्मोत्सवानिमित्त दैनंदिन विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये सकाळी 6 वाजता काकड आरती, सकाळी 7 ते 8.30 वाजता अभिषेक पुजा, दुपारी 4 ते 5.30 वाजता भजन सेवा महिला भजनी मंडळाचे, सायंकाळी 5.30 ते 6.30 वाजता प.पू.प्रल्हाद महारांजांची उपासना हरीपाठ, रात्री 7 ते 9 वाजता श्रीराम कथा कथाकार ह.भ.प.कल्पानाताई देशपांडे यांची राहिल, रात्री 9.45 वाजता शेज आरती असे कार्यक्रम राहतील. 30 मार्च गुडीपाडव्यानिमित्त दुपारी 3 ते 5.30 वाजता श्रीराम कथा कथाकार ह.भ.प कल्पनाताई देशपांडे यांची राहिल, 6 एपिल रोजी 10 ते 1 श्रीराम जन्मोत्सवानिमित्त ह.भ.प.नलीनीताई वरणगावकर बुलढाणा यांचे किर्तन राहिल. 7 एप्रिल ते 12 एप्रिल हनुमान जन्मोत्सवानिमित्त 7 ते 9 ह.भ.प. चारूदत्त आफळेबुवा पुणे यांचे किर्तन राहिल. 13 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता ह.भ.प.प्रा.डॉ.श्रीहरी महाराज पितळे संत बाळाभाऊ महाराज पितळे नरसिंह संस्थान मेहकर यांच्या काल्याच्या किर्तनाने या कार्यक्रमाची सांगता होईल. काल्याच्या किर्तनानंतर 12.30 ते दुपारी 2 वाजेपर्यंत महाप्रसादाचे दिल्या जाणार आहे. तरी कार्यक्रमाला भाविक भक्तांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्रीराम मारूती मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ.प्रमोद देशपांडे, उपाध्यक्ष सु.स.केसाळे, मधुसुदन कुळकर्णी, सचिव संजय कुळकर्णी, कोषाध्यक्ष रामानंद कविश्वर, सहसचिव नितिन भालेराव, श्रीमती वैजयंती कस्तुरे, सनदी लेखापाल सचिन वैद्य यांनी केले आहे.