spot_img

धामणदरीतील चोरीचा सहा तासात उघडा

◾ डोळ्यांत मिरकूट टाकून लुटले होते

बुलडाणा, 30 मार्च (गुड इव्हिनिंग सिटी) : चोरी करणाऱ्या भामट्याला पोलिसांनी 6 तासात अटक केल्याची घटना घडली आहे. त्याच्या कडून 1 लाख 91 हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वाखाली गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे स्वतंत्र पथक नेमून आरोपींना ताब्यात घेण्याबाबत सुचना केल्या होत्या त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू करत आरोपीला 6 तासात अटक केली आहे. 29 मार्च रोजी रोजी फिर्यादी अतुल दिगंबर भजने वय 61 वर्षे रा. भादोला यांचे तक्रारीवरुन पो.स्टे. बुलढाणा शहर येथे कलम 309(4), 3(5) भा.न्या.सं. गुन्हा दाखल करण्यात आला. भजने यांच्याकडे 20 हजार रुपये होते. त्यांनी गर्दे हॉल समोरील एटिएम मधून 70 हजार काढलेत. हे सर्व ऑटोचालक आरोपी पाहत होता. या आरोपीने भजने यांचा पिच्छा केला. बुलडाणा शहरातील धामणदरी परिसरात निर्जन स्थळी दोन आरोपींनी फिर्यादी सोबत वाद करुन, फिर्यादीच्या डोळ्यात मिरची पूड फेकून, त्यांचे खिशातून नगदी 71 हजार 200 रुपये व ईतर कागदपत्रं जबरीने घेवून, मोटार सायकरनने पळून गेले. सदर गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखे कडून समांतर तपास करुन, गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली. गुन्ह्यामध्ये 2 आरोपी निष्पन्न करुन, त्यापैकी एकाला अटक करण्यात आली. अटक आरोपींकडून 1 लाख 91 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
आरोपी वसीम शहा ईमाम शहा रा. रोहीणखेड ता. मोताळा याला अटक करण्यात आली आहे. यांमधील एक आरोपी फरार आहे त्याचा शोध पोलीस घेत आहेत.
रोख 71 हजार 200 रूपये ई-बाईक किंमत 1 लाख 20 हजार रुपये असा एकूण 1 लाख 91 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी हे संगणमत करुन किंमती वस्तु, रोख रक्कम असलेल्या इसमांना रस्त्यांमध्ये आढून, त्यांना मारहाण करुन व डोळ्यात मिरची पूड फेकून, त्यांचे जवळील नगदी रोख व ईतर मौल्यवान चिजवस्तु जबरीने चोरुन घटनास्थळावरुन पळून जात होते. बुलढाणा शहर धामणदरी परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या घटनेमुळे शहरात भितीचे वातावरण तयार झाले होते. प्रसंगी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी गुन्ह्याचे घटनास्थळाला भेट देऊन, तपास पथकांना गुन्ह्याची उकल, आरोपी व मुद्देमालाचा शोध घेणेबाबत सक्त आदेश दिले. पोलीस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाप्रमाणे गुन्ह्याची यशस्वी उकल करण्यात आली.
सदरची कामगिरी पोनि, अशोक एन. लांडे यांचे नेतृत्वात सपोनि. आशिष रोहो, पोहेकों, दिपक लेकुरवाळे, शेख चाँद, एजाज खान, पुरुषोत्तम आघाव, पोना, संजय भुजबळ, बिजय बारुळे, पोकों, मंगेश सनगाळे, गजानन गोरले, चापोकों, शिवानंद हेलगे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा, पो. अं. राजू आडवे तांत्रिक विश्लेषण शाखा-बुलढाणा यांनी केली.

 

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत