ग्रामपंचायत सदस्य पुत्राचे सरपंच व सचिवांवर आरोप
बुलढाणा, 11 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटीे) ः महापुरुषांच्या विचाराने कारभार केला पाहिजे असे प्रत्येक वेळी सांगितले जाते. महापुरुषांच्या जयंत्या साजरा करण्याचे कारण म्हणजे त्यांनी ज्या हाल अपेष्टा सहन केल्या आहेत त्याची समाजाला जाणीव व्हावी. महापुरुषांचे विचार प्रत्येक माणसांपर्यंत पोहचले पाहिजे हा मुळ उद्देश असतो. परंतु शहरालगत असलेल्या माळविहिर् ग्रामपंचायतमध्ये एक-दोन जयंत्या सोडल्या तर बाकी जयंत्या साजरा केल्या जात नाही. स्त्री शिक्षणाचा पाया ज्यांनी उभारला त्या क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती आज 11 एप्रिल रोजी सर्वत्र साजरी होत आहे. मात्र माळविहिर ग्रामपंचायत येथे साजरी केली जात नव्हती. यावर माळविहीर येथील ग्रामपंचायत सदस्य कमलताई चौधरी यांचा मुलगा आकाश चौधरी याने ग्रामपंचायत प्रशासनाला जाब विचारला परंतु त्याला अपेक्षित उत्तर मिळाले नाही. पण त्याने हा मुद्दा छेडल्यानंतर ग्रामपंचायत प्रशासन खडबडून जागे होत महात्मा फुले यांची जयंती साजरी केली. माळविहीर ग्रामपंचायत सदस्य कमलताई विलास चौधरी यांचा मुलगा आकाश चौधरी याने गुड इव्हिनिंग सिटीशी बोलताना सांगितले की, माळविहीर ग्रामपंचायत मध्ये दोन-तीन महापुरुषांच्या जयंत्या साजरा केल्या जातात. आज महात्मा फुले यांची जयंती असून ती साजरी केली नाही. सावित्रीबाई फुले यांची जयंती सुध्दा साजरी करण्यात आली नव्हती. तेव्हा सांगून सुद्धा याकडे दुर्लक्ष केले. याला सरपंच व ग्रामसेवक जबाबदार असल्याचे त्यांनी सांगितले.