spot_img

रस्त्यावर बांधकाम साहित्य असल्यास दंडात्मक कारवाई !

बुलढाणा नगर परिषदेकडून विशेष पथक तैनात

बुलढाणा, 12 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः एका कोपर्‍यात जर बांधकाम सुरु असेल आणि त्याठिकाणी वाहतूकीची कुठलीही वर्दळ नसेल तर कुणालाही अडथळा निर्माण होत नाही. परंतु प्रमुख मार्गांवर थोडे जरी साहित्य पडलेले असले की, वाहतूक खोळंबते. दोन दिवसानंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. याशिवाय लग्नसराईचे दिवस सुरु झाले होते. रस्त्यांवर गर्दी वाढणार आहे. अशा परिस्थीतीत रस्ते अधिक खुले असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेवून मुख्याधिकारी गणेश पांडे यांनी रस्ते मोकळे करण्यासाठी विशेष पथकाची निर्मीती केली आहे. रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासोबतच हे पथक जर कुणाचे बांधकाम साहित्य रस्त्यावर पडलेले असेल, तर मालकाला दंड ठोठावेल. बुलढाणा शहरात दररोज कुठे ना कुठे दुकानांचे नवीनीकरण किंवा गाळे बांधकाम सुरु आहेत. यासाठी रेती, सिमेेंट, गिट्टी तसेच बांधकामासाठी लागणारे इतर साहित्य मालक रस्त्यावरच टाकत आहेत. या साहित्यामुळे वाहतूकीला बाधा पोहोचत आहे. ट्रॅफिक जाम होवून याचे पर्यवसन कधी कधी भांडणातही होत आहे. या सर्व अडचणी समजून घेत नगर परिषदेच्या पथकाने धडक कारवाई मोहिम आरंभिली आहे. सुनिल बेंडवाल यांना पथकप्रमुख नेमण्यात आले असून पहिल्याच दिवशी चार ते पाच जणांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ‘आपल्या शहरातील नागरिकांना आपल्यामुळे कुठलाही त्रास होवू नये, या शुद्ध भावनेतून वाहतूकीला अडथळा निर्माण करणारे बांधकाम साहित्य रस्त्यातून ताबडतोब उचलून घ्यावे आणि होणारी अप्रिय कारवाई टाळावी.’, असे आवाहन मुख्याधिकारी श्री पांडे यांनी गुड इव्हिनिंग सिटीच्या माध्यमातून केले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत