spot_img

दिल्ली-मुंबई आयपीएल मॅच वर बुलढाण्यात सट्टा

दोन सट्टेबाज साहित्यासह अटक

बुलढाणा, 14 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) : सध्या आयपीएलच्या क्रिकेट मॅच सुरू आहे. त्यामुळे सट्टेबजारात वाढ झाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघांना अटक केली आहे. पोलिस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक अशोक लांडे व सुनिल अबुंलकर यांच्या आदेशाने कारवाई केली जात आहे. 13 एप्रिल रोजी बुलढाणा शहरातील संभाजीनगर येथील दोघे घरात जुगार खेळत होते. आयपीएलच्या हार जीत वर अवैधरित्या जुगार खेळताना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून एल ई डी 15 हजार, दोन मोबाईल 27 हजार रुपये असा एकूण 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश देविदास भोसले (47), रवी देविदास भोसले (44) रा.संभाजीनगर, बुलढाणा या दोन भावांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्या वर बुलढाणा शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई ही पीएसआय पंकज सपकाळे, हे. कॉ. दीपक लेकुरवाळे, एजाज खान, दिगंबर कपाटे, एनपीकॉ. विजय पैठणे, पो.कॉ. गजानन गोरले, दीपाली चव्हाण यांनी केली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहे. या सट्टेबाजीत भोसले बंधू व्यतिरिक्त आणखी कोण कोण सहभागी आहेत? याचाही तपास पोलिसांनी घ्यावा अशी मागणी होत आहे

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत