बुलढाणा, 20 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः राजूर घाटात ब्रेक फेल झाल्याने दुधाचा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. आज 20 एप्रिल रोजी दुपारी 1 वाजता धाड येथील अमर डेअरी चा दूध वाहतूक करणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे
ट्रकचा एअर ब्रेक फेल झाल्यामुळे घाटातील देवीच्या मंदिराच्या अलीकडे दुधाचा ट्रक दुपारी 1 वाजताच्या दरम्यान पलटी झाल्याची घटना राजुर घाटात घडली आहे. सुदैवाने ट्रक डाव्या बाजूला पलटी झाल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. ड्रायव्हरला किरकोळ इजा झाली. घटनेची माहिती मिळताच त्या ठिकाणी आझाद हिंद संघटनेचे अॅड सतीशचंद्र रोठे पाटील यांनी भेट देत प्राथमिक मदत केली. बुलढाणा शहर पोलीस स्टेशनची पथक सुद्धा दाखल झाले होते.