spot_img

एप्रिलच्या प्रारंभी झाली होती पहलगमाची ‘रेकी’

गुप्तचर यंत्रणांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणार्‍यांवर कारवाई होईल का ?

बुलढाणा, 23 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी / रणजीतसिंग राजपूत) ः अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेल्या आतंकवाद्यांनी पहलगामच्या बायसरान घाटीजवळ घोडेस्वार यात्रेकरूंवर अंधाधुंद फायरिंग केली आणि निवडून निवडून 28 निरपराध्यांना ठार केले. ऑगस्ट, 2019 मध्ये जम्मू काश्मिरमधून कलम 370 हटविल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे आणि 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतरचा हा सर्वात मोठा दहशतवादी अ‍ॅटॅक आहे, ज्यात सामान्य नागरिकांना लक्ष्य केले गेले आहे. हल्ल्याची जबाबदारी लश्कर-ए-तैय्यबाशी संलग्नित टीआरएफ म्हणजे द रेजिस्टेंट फ्रंटने घेतली आहे. पोलिसांच्या वर्दीत आलेल्या अत्याधुनिक शस्त्रांनीयुक्त हल्लेखोरांनी पर्यटनासाठी आलेल्या सामान्यांना ठार मारण्यापूर्वी त्यांचा धर्म विचारला. खातरजमा करण्यासाठी कलमा पठन करण्यास सांगितले आणि नंतर गोळी घातली. पाकिस्तानने सदर हल्ल्यापासून तोंड फिरविले आहे. परंतु सोशल मिडीयावर दावा करण्यात येत आहे की, सीमारेषेवर पाकिस्तानने सैन्याला अर्लट मोडवर ठेवले आहे आणि आपल्या युद्ध विमानांचे आकाशात भरारी घेणारे स्क्रीनशॉट शेअर करण्यात येत आहे. आता नेमके काय सुरु आहे, हे स्पष्ट नसले तरी 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर मोठी अ‍ॅक्शन घेण्यात आली होती. पहलगामच्या ज्या बायसरन परिसरात दहशतवादी हल्ला झाला, तिथे कुठल्याच प्रकारचा सुरक्षा बंदोबस्त नव्हता, ना ही कुठल्याच प्रकारचे सुरक्षा नियंत्रण… दहशतवाद्यांना हीच संधी सापडली आणि ते आपल्या कुकृत्याला पार पडण्यात यशस्वी झाले. आता प्रश्न उपस्थित होत आहे की, दहशतवादाविरोधातील लढाईत नेमकी त्रुटी कुठे राहत आहे.

370 हटविले ठीक.. आणखी कडक उपाययोजना हव्या

एव्हढं सगळं असूनही दहशतवाद्यांना खूनी खेळ खेळण्यासाठी मोकळे मैदान कसे उपलब्ध होते ? शेवटी कुठल्या स्तरावर हा निष्काळजीपणा झाला आहे? अशा बेफिकीरीला जबाबदार असणार्‍यावर काही कारवाई होणार का ? जर होत नसेल तर का होत नाही ? जेव्हा भ्रष्ट किंवा योग्य कर्तव्य न बजावणार्‍या अधिकार्‍यांना जबर्दस्ती निवृत्त केले जाते, तर अशा प्रकरणांत बेजबाबदार असणार्‍यांचा शोध का घेतला जात नाही. एखाद्या रेल्वे अपघातात अधिकार्‍याला फटका बसतो. जिल्हा स्तरावर कायदा आणि सुव्यवस्थेसाठी जबाबदार्‍या निश्चीत आहेत. मग दहशतवादी हल्ल्यांनंतर संबंधित अधिकार्‍यांवर कारवाईच्या बातम्या का येत नाहीत. आवश्यक आहे की, आणखी कडक उपाययोजना करण्यात याव्यात.

काही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

1. पहलगाम जश्या पर्यटनस्थळांना दहशतवादी सहजपणे लक्ष्य करतात म्हणजे याठिकाणी सुरक्षेचा पाहीजे तसा बंदोबस्त नव्हता. शिवाय आपातकालिन जलद प्रत्युत्तर देण्यासंदर्भात काहीच तरतूद नव्हती. याचा पूर्ण फायदा आतंकवाद्यांनी उचलला.

2. सुत्रांनुसार गुप्तचर यंत्रणांनी काही इनपुट्स दिले होते. परंतु त्यांचे योग्य विश्लेषध केले गेले नाही किंवा त्यानुसार कुठलीच कारवाई केली गेली नाही. एप्रिलच्या सुरुवातीला आतंकवाद्यांकडून काही हॉटेलची रेकी करण्याची गुप्त माहिती मिळाली होती. गुप्तचर सुत्रांनी इथपर्यंत इशारा दिला होता की, दहशतवादी संघटना पहलगाम जशा पर्यटन स्थळांना कुठल्याही क्षणी लक्ष्य करू शकतात आणि ते मोठ्या हल्ल्याच्या तयारीत आहेत.
3. मार्चच्या प्रारंभी केंद्रीय गृह सचिव गोविंद मोहन यांनी नुकतीच जम्मूमध्ये उच्च स्तरीय सुरक्षा बैठक घेतली. 6 एप्रिलला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीसुद्धा श्रीनगरमध्ये इंटीग्रेटेड आघाडीच्या बैठकीचे अध्यक्षपद भूषविले. दोन्ही ठिकाणी गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीची शहानिशा किंवा त्यावर चर्चा झाली नसेल का ? पहलगाम जशा पर्यटन स्थळांच्या सुरक्षेबाबत कुणाचेच लक्ष गेले नसेल का ?
4. आश्चर्यजनक आणि तितकीच गंभीर बाब आहे की, दहशतवादी घटनास्थळावर पोहोचून चुपचाप हॉटेलांचे निरीक्षण करून जातात, स्थानिक काही गद्दारांचे सहकार्यही मिळवितात आणि हल्ल्यासाठी त्यांना असे ठिकाणी सापडते, ज्या ठिकाणी प्रत्युतरासाठी तिथे एकही भारतीय सैनिक नसतो. यापेक्षा आणखी मोठी त्रुटी या सुरक्षा व्यवस्थेत कुठली असेल ?

आवश्यक उपाययोजनांमुळे रोखता आला असता हल्ला

ससंदेत कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तानकडून जम्मू काश्मिरचा मुद्दा अंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर उठविणे बंद झाले नाही पण त्यातील हवा जरूर निघाली आहे. भारताच्या डिप्लोमॅटिक प्रयत्नांमुळे पाकिस्तानला अरब देश आणि मुस्लिम देशांकडून पहिल्यासारखे समर्थन मिळणे बंद आहे, हे पण खरे आहे. त्यामुळेच आर्थिक संकटाच्या खाईत लोटलेल्या पाकिस्तानकडून अशा प्रकारच्या खुरापती सुरु आहे.

* पहलगामचा दहशतवादी हल्ला अशा वेळेस घडविण्यात आला जेव्हा अमेरिकेचे उपराष्ट्रपति जेडी व्हेंस आपल्या परिवारासह भारत दौर्‍यावर आहेत आणि पंतप्रधान मोदी सौदी अरेबियाच्या दौर्‍यावर… संधी साधून हल्ला करण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणांच्या सुत्रांकडून प्राप्त माहितीनुसार चार दहशवतवाद्यांनी हल्ला केला. त्यातील दोन पाकिस्तानी नागरिक आहेत. परंतु पाकिस्तानचा दावा आहे की, त्यांचा या हल्ल्याशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. मुंबई हल्ल्यात जीवंत पकडण्यात आलेल्या कसाबलाही पाकिस्तानने आपला नागरिक मानण्यास नकार दिला होता, हे विसरता येणार नाही.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचे एक विधान समोर आले आहे. ते म्हणतात की, पाकिस्तानचा या हल्ल्याशी कुठलाच संबंध नाही. भारतातच अनेक संघटना आहेत, जे स्थानिक पातळीवर विद्रोह करतात.. एक नाही, दोन नाही तर डझनभर संघटना अशा आहेत. नागालँड पासून काश्मिर पर्यंत, दक्षिणेत, छत्तीसगडमध्ये, मणिपूरमध्ये विद्रोही संघटना असल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानकडून अशा भूमिकेशिवाय इतर पारदर्शक भूमिकेची अपेक्षा व्यर्थ आहे.

* 2000 मध्ये 21 ते 25 मार्च दरम्यान तत्कालिन अमेरिकेचे राष्ट्रपति बिल क्लिंटनचा दौरा होता आणि या दौर्‍याच्या बरोबर एक दिवस पहले, 20 मार्च रोजी रात्री अनंतनागच्या चिट्टीसिंहपोरामध्ये 36 शिखांचा नरसंहार करण्यात आला होता. पहलगामचा हल्ला या नरसंहाराशी साधर्म्य साधणारा आहे, यात शंका नाही.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत