spot_img

ना.प्रतापराव जाधव यांच्या प्रयत्नातून कश्मीरमध्ये अडकलेल्या 47 पर्यटकांचा मार्ग मोकळा

विशेष ट्रेनची केली व्यवस्था

बुलढाणा, 24 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः जम्मू काश्मिरातील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्यानंतर भयभित झालेल्या आणि जम्मू काश्मिरमध्ये अडकुन पडलेल्या पर्यटकांची केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जम्मू-काश्मीरमध्ये जाऊन घेतली भेट .. तुम्हाला घरी सुखरुप पोहचविण्यासाठी रेल्वे गाडीची व्यवस्था करण्यात आल्याचे सांगताच पर्यटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल या पर्यटकांना आज दिल्ली येथे आणण्यात येणार आहे

जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांना लक्ष करत दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 28 भारतीय पर्यटक मृत्युमुखी पडले आहे मृतकांमध्ये 6 जण हे महाराष्ट्रातील आहेत. शिवाय अनेक पर्यटक जम्मू आणि कश्मीरमध्ये अडकून पडले आहेत तेथील परिस्थितीमुळे ते भयभीत झाले होते लवकरात लवकर घराकडे पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून ते आणि त्यांचे कुटुंबीय मागणी करत होते बुलढाणा जिल्हयातील जवळपास 49 पर्यटक जम्मू काश्मिरमध्ये पर्यटनांसाठी गेलेले आहेत हे सर्व पर्यटक सुखरुप आहेत. आज 24 एप्रिलच्या सकाळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव हे जम्मू-काश्मीरला गेले पर्यटकांसोबत संवाद साधून सरकार तुमच्या पाठीशी आहे घाबरू नका तुम्हाला घरी जाण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सरकारच्यावतीने व्यवस्था करण्यात आली आहे असं पर्यटकांना सांगतात त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल आज दुपारी 3 वा जम्मू कश्मीर वरून हे पर्यटक दिल्लीकडे रवाना होणार आहे दिल्ली येथे आल्यानंतर संबंधित पर्यटकांना त्यांच्या घराकडे पोहचणाऱ्या रेल्वेने त्यांना पाठवल्या जाणार आहेत या सर्व पर्यटकांसाठी विशेष रेल्वे बोगी उपलब्ध करून देण्यात आली आहे केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयाशी अनेक पर्यटकांनी व पर्यटकांच्या नातेवाईकांनी संपर्क साधला होता त्यांना घरी सुखरुप पोहचविण्याच्या दृष्टिकोनातून केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी गृहमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केलेत

 या पर्यटकांमध्ये राजीव पुरवार, भारती पुरवार, प्रणव पुरवार, प्रांशु पुरवार, अनुज पुरवार, सुप्रिया पुरवार, आहिला पुरवार, संदीप खेडकर, सुपेश खेडकर, सर्वेश खेडकर, आशिष जैन, दिपाली जैन, अमोल पांढरे, आरती पांढरे, श्रेया पांढरे, देवांश पांढरे, सुरेखा हिंगणे,शितल हिंगणे, श्रीकांत महल्ले, उज्ज्वला महल्ले, स्वराज महल्ले, विशाल धांडे, गंगा धांडे, गजानन काळे, प्रिया काळे, सुयोग काळे, ज्ञानेश्वर इंगळे, वर्षा इंगळे, निखिलेश बेलोकार, कोमल बेलोकार, ईशानवी बेलोकार, योगेश हिरडकर, श्रध्दा हिरडकर, विष्णू पिवळटकार, मेघा सपकाळ, मंगेश वर्तेकार, गोकुल वर्तेकार, अवी वर्तेकार, मल्हार वर्तेकार, संजय चौधरी, देव पाटील, नारायणी पाटील, शिवम खंडेलवाल, मनोहर दळवी, पुनम दळवी, आराध्या दळवी यांचा समावेश आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत