spot_img

युद्धाचा अनुषंगाने उद्याच्या भेंडवळ मांडणीवर अनेकांच्या नजरा…!

बुलढाणा, 29 एप्रिल (गुड इव्हिनिंग सिटी) ः भेंडवळ येथील घट मांडणीत स्थानिक ते आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत भाकित वर्तवली जातात. त्यामुळे पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी भ्याड दहशतवादी हल्ला झाला होता. त्याचा काही परिणाम भारतावर किंवा पाकिस्तानवर होईल का ? याचे भाकित वर्तवल्या जावू शकते. दोन्ही देशात युध्द होण्याची शक्यता राजकीय वक्तव्यावरून आणि संबधावरून दिसून येत आहे. भारताने पाकिस्तानला धडा शिकविण्यासाठी काही निर्णय घेतले आहेत. त्यामुळे दोन्ही देशात युध्दजन्य परिस्थिती निर्माण होवू शकते का याचे भाकीत भेंडवळ मांडणी नंतर स्पष्ट होईल.
भेंडवळ येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी अक्षय्य तृतीयेला भेंडवळ येथे घटमांडणी करण्यात येणार आहे. कृषी विषयक पिके व पर्जन्यमान, देशाचे संरक्षण, राजकीय इत्यादी सर्वंकष वार्षिक अंदाज व्यक्त करणारी परंपरा वाघ परिवाराने जपलेली आहे. साडेतीनशे वर्षाची परंपरा असलेली अक्षय्य तृतीयेची घट मांडणी उद्या 30 एप्रिल रोजी सायंकाळी करण्यात येणारे असून 1 मे रोजी सूर्योदयापूर्वी येणार्‍या वर्षातील भाकीत वर्तवण्यात येणार आहे.
या मांडणीचे भाकिते आजपर्यंत बहुतांशी खरी ठरत असल्याने शेतकर्‍यांचा व शेतीशी निगडित असणार्‍या व्यावसायिकांच्या दृष्टीने हा वार्षिक अंदाज जसा उत्कंठेचा विषय असतो. त्याचप्रमाणे राजकीय भाकीत देखील ऐकण्यासाठी राजकीय मंडळी मोठ्या प्रमाणात येथे गर्दी करत असतात. भेंडवळ येथील वाघ कुळातील चंद्रभान महाराज वाघ यांनी सुरू केलेली या मांडणीची परंपरा आज साडेतीनशे वर्षानंतरही त्यांच्या वंशजानी जिवंत ठेवली असून दिवसेंदिवस अधिक लोकप्रिय होत आहे. यावर्षी सर्व प्रकारच्या बदलत्या वातावरणचा फटका कोणाला कसा बसतो. तसेच भारत व पाकिस्तान या देशाती संबधांविषयीचे भाकित पुढे येणार असल्याने याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत