जिल्हा स्त्री रूग्णालयाच्या डॉक्टरांनी केली यशस्वी शस्त्रक्रिया
बुलढाणा, 3 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्हा स्त्री रुग्णालयात महिलेच्या पोटातून काढला तब्बल 3 किलो 500 ग्रॅमचा गर्भाशयातील गाठीचा मासाचा गोळा काढण्यात आला आहे. एक महिला अनेक दिवसांपासून पोटदुखीने त्रस्त होती. अनेक ठिकाणी उपचार घेऊन देखील केले परंतू काही फरक पडत नसल्याने तिला मोठ्या शहरात उपचारासाठी जाण्याचे सांगितले. तेव्हा 1 मे रोजी जिल्हा स्त्री रुग्णालयात महिला भरती झाली. सोनोग्राफी केल्यावर पोटात गोळा असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. तिच्यावर आज 3 मे शस्त्रक्रिया करून सदर महिलेच्या पोटातून तब्बल 3 किलो 500 ग्रॅमचा गर्भाशयातील गाठीचा मासाचा गोळा काढण्यात आला. सदर गोळा तपासणी करिता पाठविण्यात आला आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.भागवत भुसारी, बुलढाणा शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कैलास झिने व वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्री रोग तज्ञ डॉ. संतोष वानखेडे, डॉ. संजीवनी वानरे, भूल तज्ञ डॉ. प्रियांका मोरे पाटील, डॉ. अभिश्री, परिचारिका मनिषा राठोड, सुनीता मंजुळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली. शस्त्रक्रियेकरिता सूरज हिवाळे, आशिष आव्हाड, शुभम आदे, सोनाली गवई यांनी यांची मदत मिळाली.