बुलढाणा, 6 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः कुछ तो भी बडा होनेवाला है, हे सर्वांनाच माहित आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या बाहु स्फुरलेल्या आहेत. पण युद्ध कधी आणि कुठल्या बाजूने सुरु होणार, हे सांगता येणार नाही. अर्थात संभाव्य युद्धाच्या पार्श्वभूमिवर संपूर्ण देशाला युद्धजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार केले जात आहे. त्याचाच भाग म्हणून देशभरात विविध ठिकाणी उद्या, 7 मे रोजी मॉक ड्रिल होत आहे. राज्यात 16 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिल होत असून बुलढाणा जिल्ह्याचा मॉक ड्रिल मध्ये समावेश नाही. परंतु बुलढाणा जिल्हा प्रशासनाने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात आपत्ती व्यवस्थापनची बैठक घेवून वरील संदर्भात आढावा घेतला.
आपत्कालीन परिस्थितींमध्ये नागरिकांनी कशा प्रकारे वागावे, यासाठी मार्गदर्शक सूचना तयार केल्या जात असल्याची सूत्रांची माहिती. तीन सत्रांमध्ये ही मॉक ड्रिल राबवण्यात येणार असून, यामध्ये सायरन तपासणी, नागरिकांचे स्थलांतर, बचाव कार्य आदी प्रात्यक्षिकं घेतली जाणार आहेत. आज दुपारच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत आढावा घेण्यात आला. यात औषधींचा साठा, उपलब्ध वैद्यकीय सुविधा, रक्तसाठा अशा विषयांवर माहिती घेण्यात आली. विविध विभागाचे प्रमुख यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्रात मुंबई, उरण, तारापूर, ठाणे, पुणे, नाशिक, रोहा-नागोठणे, मनमाड, सिन्नर, थड-वायाशॉट, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, भुसावळ, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या शहरांमध्ये मॉक ड्रिल होणार आहे.
प्रशासनाकडून सर्व यंत्रणांना अलर्ट राहण्याच्या सक्त सूचना. राज्य सरकारकडून अंतर्गत पातळीवर हालचालींना वेग. पालकमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना प्रशासनासोबत संपर्कात राहण्याचे निर्देश. मॉक ड्रिल च्या पाश्वभूमीवर राज्य सरकारची आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक मंत्रालयात सुरू. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक सतीश खडके यांच्या उपस्थितीत या बैठकीला सुरवात झाली आहे. राज्यातील सर्व महापालिकेचे आयुक्त आणि प्रमुख अधिकार्यांसोबत व्हीसी द्वारे या बैठकीला सुरवात झाली आहे.
सायरन वाजल्यावर काय करालं?
* तात्काळ सुरक्षित आश्रयस्थळी जाल.
* 5 ते 10 मिनिटात सुरक्षित ठिकाणी पोहोचा.
* सायरन वाजल्यानंतर घाबरुन जाऊ नका.
* फक्त मोकळ्या जागेपासून लांब रहा.
* घरात आणि सुरक्षित इमारतींच्या आत प्रवेश करा.
* टीव्ही, रेडियो, सरकारी अलर्ट्सवर लक्ष द्या.
* अफवावर विश्वास ठेऊ नका प्रशासनाच्या सूचनांच पालन करा.
सायरन हे सरकारी भवन, प्रशासनिक भवन, पोलीस मुख्यालय, फायर स्टेशन, सैन्य ठिकाणं, शहरातील मोठे बाजार, गर्दीच्या जागा इथे वाजणार आहे. सिविल मॉक ड्रिलमध्ये जिल्हाधिकारी, स्थानीय प्रशासन, सिविल डिफेंस वार्डन, पोलिस, होम गार्ड्स, कॉलेज-स्कूल विद्यार्थी, नॅशनल कॅडेट कॉर्प्स (एनएसीएसी), नॅशनल सर्विस स्कीम (एनएसएस) नेहरू युवा केंद्र संगठन यांचा सामवेश असणार आहे.