बुलढाणा, ६ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : नविन पोलिस अधिक्षक कार्यालयतील पीओपीचा खांब कोसळल्याची घटना घडली आहे. काही महिन्यांपूर्वीच पोलिस अधीक्षक कार्यालयाचे लोकार्पण झाले आहे. बुलढाणा शहरातील देवीच्या मंदीर परिसरात भव्य असे पोलिस अधीक्षक कार्यालय बनविण्यात आले. परंतु आज सायंकाळी ५ वाजेपासून जोरदार हवा सुटली आहे. या हव्येच्या वेगाने पोलिस अधीक्षक कार्यालयच्या बाह्य भागातील पीओपी व्दारे नक्षीकाम केलेले खांब कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने सायंकाळी कामकाज आटपलेले होते. पोलिस अधीक्षक कार्यालय परिसरात कर्मचारी व नागरिकांची उपस्थिती नव्हती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. जिल्ह्यातील हवामान बदलामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नाही. यासाठी प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कडून करण्यात आले आहे. थोड्याशा वादळाने खांब फुटल्याने बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.