बुलढाणा, ७ मे (गुड इव्हिनिंग सिटी) : मुंबईत आज ७ मे रोजी देवगिरी निवासस्थान येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत बुलढाणा जिल्हा परिषदेच्या माजी सभापती श्रीमती. पुनम राठोड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट बुलढाणा शहराध्यक्ष अनिल बावस्कर, शहर कार्याध्यक्ष सत्तार कुरेशी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) जिल्हाध्यक्ष नरहरी गवई यांच्यासह बुलढाणा यांच्यास. प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला. यावेळी हा प्रवेश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने महत्वाचा मानला जात आहे.
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री तथा पालकमंत्री मकरंद पाटील, माजी आमदार वसंत शिंदे, प्रदेश उपाध्यक्ष महेश शिंदे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, बुलढाणा जिल्हाध्यक्ष नाझेर काझी, जिल्हा कार्याध्यक्ष शंतनु बोंद्रे, ॲड.टि डी अंभोरे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.