बुलढाणा, 13 मे, (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाण्याचे माजी आमदार राहिलेले विजयराज शिंदे सध्या भाजपाचे लोकसभा निवडणूक संपर्कप्रमुख म्हणून कार्यरत आहे. त्यांना भाजप पक्षश्रेष्ठींनी आता बुलढाणा भाजपा जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन त्यांची नियुक्ती केली आहे. तर घाटाखाली सचिन देशमुख यांची भाजपा जिल्हाध्यक्ष पदी निवड झाली आहे. विजयराज शिंदे एकसंघ शिवसेना असताना 1995, 2004,2009 असे तीन टर्म बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. विजयराज शिंदे हे शिवसेना व मग 2019 ला वंचीत बहुजन आघाडीकडून चांगली लढत देत दुसर्या क्रमांकावर होते. तर 2024 ची बुलढाणा लोकसभा लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी अर्ज ही दाखल केला होता परंतू ही जागा महायुतीत शिवसेना शिंदे गटाला सुटल्याने त्यांनी पक्षाचा आदेश मानत माघार घेतली. तर 2024 च्या विधानसभा लढण्याची तयारी त्यांनी सुरू केली होती. तेव्हा पण बुलढाण्याची जागा शिवसेना शिंदे गटाला सुटल्यामुळे त्यांनी अर्ज मागे घेतला. पक्षाचा आदेशाचा मान राखल्यामुळेच त्यांना स्थानिक स्वराज्य निवणूकांच्या पार्श्वभुमीवर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आल्याचे त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.