spot_img

निलेश तांबे यांनी रात्रीच स्विकारला पोलिस अधीक्षक पदाचा पदभार 

बुलढाणा, 23 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः बुलढाणा पोलिस अधीक्षक पदाचा निलेश तांबे यांनी पदभार स्विकारला आहे. काल 22 मे रोजी राज्यातील 21 पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या गेल्या. आठ महिन्यापूर्वीच पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार हाती घेतलेल्या विश्‍व पानसरे यांच्या ही बदलीचा आदेश धडकला. काल 22 मे च्या रात्री 11 वाजता अप्पर पोलिस अधीक्षक श्रोणिक लोढा यांनी नवनियुक्त पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचे स्वागत केले. निलेश तांबे हे 2018 च्या महाराष्ट्र केडरचे आयपीएस अधिकारी आहे. निलेश तांबे हे आधी नंदुरबार येथे अप्पर पोलिस अधीक्षक आणि त्यानंतर नागपूर मध्ये गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत होते. तांबे यांची जिल्हा पोलिस अधीक्षक म्हणून बुलढाणा येथे पहिली पोस्टिंग आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याची व निवडणुका शांततेत पार पाडण्याची जबाबदारी तांबे यांच्यावर‌ असणार आहे.
https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत