spot_img

बुलढाण्यासाठी ना.प्रतापराव जाधव ‘संकटमोचक’

केदारनाथ येथे अडकून पडलेल्या भाविकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने सोडले सुरक्षित ठिकाणी

बुलढाणा, 20 मे (गुड इव्हिनिंग सिटी) ः केंद्रिय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील कुठल्याही कठीण प्रसंगात असणार्‍या व्यक्तील मदतीचा हात मिळत आहे. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर तेथे बुलढाणा जिल्ह्यातील काही नागरिक अटकलेले होते. त्यांना मदत करण्यासाठी स्वतः ना.जाधव हे त्याठिकाणी गेले होते. त्यांनी त्या प्रवाशांना घरापर्यंत सोडण्याची व्यवस्था केली होती. तसेच वैष्णव देवी येथे अडकलेल्या भाविकांना सुध्दा त्यांनी मदत केली. ऑपरेशन सिंदुर च्या दरम्यान भारत पाकिस्तनमध्ये युध्दजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्ह पंजाब मधील जालंधर येथे अडकलेल्या अथर्व मापारीला ना.जाधव यांच्या दिल्ली येथील निवास्थानी आण्यात आले होते. तेथून लोणार पर्यंत पोहचविण्याची व्यवस्था सुध्दा ना.जाधव यांनी केली.

अतिवृष्टीमुळे केदारनाथ येथे अडकुन पडलेल्या पाच महाराष्ट्रीयन नागरिकांना  हेलिकॉप्टरच्या मदतीने मुक्त काशी येथे सुरक्षित पोहोचवण्याचे काम केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या टीमने केले आहे. सुरक्षित ठिकाणी पोहोचलेल्या बद्दल भाविकांनी मानले केंद्रीय मंत्री व त्यांच्या टिमचे  आभार मानले आहे.

राज्यातील नाशिक येथील धीरेंद्र वाघ  डॉ पूनम रेंडीवार पुणे येथील ज्योती घोगे नागपूर येथील राधिका अवस्थी व त्यांचे अन्य सहकारी केदारनाथ येथे दर्शनासाठी गेले होते 18 मे रोजी केदारनाथ येथे अतिवृष्टी झाली त्यामुळे रस्ते बंद झाले अशातच या दोन महिलांची प्रकृती खराब झाली दरम्यान त्यांच्या सहकार्यानी युवा सेना  जिल्हाप्रमुख ऋषिकेश जाधव प्रा डॉ सचिन जाधव यांच्याशी संपर्क साधून  अपबीती कथन केली  त्यानंतर केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दिल्ली येथील जनसंपर्क कार्यालयाच्यावतीने उत्तरांचल सी एम ओ  कार्यालयाशी संपर्क साधण्यात आला त्यांना तात्काळ मदत करण्याच्या दृष्टिकोनातून निर्देशित करण्यात आले अतिवृष्टी थांबल्यानंतर केदारनाथ येथे अडकून पडलेल्या या महाराष्ट्रातील भाविकांना हेलिकॉप्टरची मदत खाली मुक्त काशी येथे सुरक्षित रित्या सोडण्यात आले या भाविकांच्या संपर्कात केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांचे दिल्ली येथील स्वीय सहाय्यक अचल भाटिया होते संकटकाळात मिळालेल्या  मदतीबद्दल या भाविकांनी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव व त्यांच्या टीम आभार मानले आहे .

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत