अवैध देशी बनावटीच्या पिस्टलसह दोघे अटक
एलसीबीची धडक कारवाई
बुलढाणा : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी बुलढाणा पोलिसांनी अवैध शस्त्रास्त्रांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली आहे. नांदुरा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील निमगाव फाट्याजवळ स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून अवैध देशी बनावटीचे पिस्टल बाळगणाऱ्या दोघांना रंगेहात अटक केले आहे. जप्त केलेला मुद्देमालामध्ये पोलिसांनी आरोपींकडून देशी बनावटीचे पिस्तूल किंमत ४५ हजार
होंडा शाईन मोटार सायकल ३० हजार रुपये, मोबाईल १० हजार रुपये असा एकूण मुद्देमाल ८५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
अटक करण्यात आलेले आरोपींमध्ये रवींद्र विठ्ठल वेरूळकार रा. येरळी, ता. नांदुरा, पवन कौतीकराव वेरूळकार रा. येरळी, ता. नांदुरा यांना अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेश राज्याच्या लगत असलेल्या पोलीस स्टेशन हद्दीत अवैध शस्त्रांची तस्करी व विक्री रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला विशेष निर्देश दिले होते. ११ सप्टेंबर २०२६ रोजी निमगाव फाट्याजवळील ‘माऊली बार’ येथे काही इसम विनापरवाना पिस्तूल घेऊन आल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तत्काळ सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी पोलीस स्टेशन नांदुरा येथे आरोपींविरुद्ध आर्म अॅक्ट (कलम ३, ७, २५) सह महाराष्ट्र पोलीस कायदा (कलम १२३, १३५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास नांदुरा पोलीस करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पिंपुष जगताप व अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत ठाकरे, सपोनि. यशोदा कणसे, पोहेकॉ. विजय वारुळे, पोकॉ. मंगेश सनांन्से, अमोल बनारे, सतीश नाटेकर, मनोज खरडे, चालक पोहेकॉ. समाधान टेकाळे आणि तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोकॉ. कैलास ठोंबरे यांच्या पथकाने केली.





Total Users : 1395544