पत्रकार कायस्थ यांच्या जीवाला धोका..?
बुलढाणा, 29 मे (गुड इव्हिनिंग सिटी) : शहरातील ज्येष्ठ पत्रकार जितेंद्र देवचंद कायस्थ यांच्या घराजवळ 26 मे रोजी दुपारी एक घटना घडली. त्यामध्ये चार अज्ञात इसमांनी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणी घुसखोरी करत घरफोडीचा प्रयत्न केला. या प्रयत्नात एका कुटुंबातील मुलावर हल्ल्याचाही प्रयत्न करण्यात आला.
सदरील घटना शिव शॉपिंग कॉम्प्लेक्स, कारंजा चौक येथे घडली. पत्रकार कायस्थ यांच्या इमारतीत दुसर्या मजल्यावर त्यांचे वास्तव्य असून, पहिल्या मजल्यावर व्यापारी मीटिंग हॉल आहे. चार जणांनी परिसरात सर्वेक्षण केल्यावर हॉलचे कुलूप तोडून प्रवेश केला. कुलकर्णी यांच्या आजारी पालकांनी आरडाओरड करत बचाव मागितला. त्यांचा नातू धावून गेला असता, अज्ञात इसमाने त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.
याचवेळी दुसरा इसम कायस्थ यांच्या राहत्या फ्लॅटकडेही पोहोचला होता. कायस्थ यांचा नातू त्याला समोर दिसताच तो तात्काळ पळून गेला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, फुटेज पोलिसांकडे जमा करण्यात आले आहे. हे आरोपी नेमकं कुठल्या उद्देशाने आले होते त्यांच्या हातात असलेल्या पिशवीमध्ये नेमकं काय होते असे विविध प्रश्न या ठिकाणी उपस्थित होत आहे. याप्रकरणातील आरोपींना पोलिसांनी तात्कळ शोधून सखोल तपास कराव अशी मागणी करण्यात येत आहे.