बुलढाणा, 3 जून (गुड इव्हिनिंग सिटी) ः ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी कामगिरीनंतर भारताने पाकिस्तानचा सीझ फायरचा निर्णय का मान्य केला ? पी.ओ.के. परत का मिळविले नाही ? भारताचे किती नुकसान झाले ? इत्यादि अनेक प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाले. या प्रश्नांचे निराकरण करण्याच्या दृष्टीने
गर्दे वाचनालयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ऑपरेशन सिंदूर या विषयावर जळगांव खान्देश येथील कॅप्टन मोहन कुळकर्णी हे सुहास जतकर यांचेशी संवाद साधनार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गर्दे वाचनालयाचे अध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष गोकुल शर्मा हे राहणार असून बुलढाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष राधेश्याम चांडक यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. आज मंगळवार, ३ जून २०२५ ला गर्दे वाचनालयाच्या सभागृहात संपन्न होणा-या या कार्यक्रमाला अकोला येथील खंडेलवाल विद्यालयाचे कोषाध्यक्ष नाना कुळकर्णी, बुलढाणा नगर संघचालक महेश पेंडके, जेष्ठ पत्रकार विश्वंभर वाघमारे हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गर्दे वाचनालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
|