बार असोसिएशनाचा ठराव घेऊन निर्णयास विरोध
बुलढाणा, 3 जून (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा मुख्यालय सोडून चिखली येथे उपविभागीय अधिकारी महसुल यांचा कॅम्प न घेण्याची मागणी बुलढाणा जिल्हा वकील संघाच्या वतीने करण्यात आली आहे. चिखली येथे कॅम्प घेवू नये यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी करण्यात आली आहे. तसेच बार असोसिएशनच्या वतीने 2 जून रोजी त्यासंदर्भात एकमताने ठराव सुध्दा पारीत करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुलढाणा जिल्हयातील महसुल, ग्रामपंचायत इ. प्रकरणे हे आपल्या विभागाअंतर्गत बुलढाणा येथे आपल्या मुख्यालयी उपविभागीय अधिकारी (महसुल) यांचे अधिनस्त, आजतागायत सुरु आहेत.
परंतु अचानकपणे चिखली येथे नव्याने कॅम्प आयोजीत करुन मुख्यालयी सुरु असलेली प्रकरणे चिखली येथे घेण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता असल्याने ज्ञात झाले आहे व तशी कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.
2 जून रोजी त्या अनुषंगाने बुलढाणा जिल्हा वकील संघाची तातडीची विशेष सभा आयोजीत करुन तसा ठराव देखील एकमताने पारीत करण्यात आलेला आहे.
वास्तविक भौगोलिकदृष्ट्या बुलढाणा ते चिखली हे अंतर 20 कि.मी असून चिखली येथून बहुतांश वकील मंडळी बुलढाणा येथे नियमीतपणे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, जिल्हाधिकारी न्यायालय, कौटुंबीक न्यायानय, धर्मदाय आयुक्त, ग्राहक निवारण आयोग, उप निबंधक सहकार न्यायालय इ. न्यायालयात प्रकरणात वकील म्हणून कर्तव्य बजावत असतात व आहेत.
तेव्हा फक्त चिखली महसूल मंडळातील प्रकरणासाठी बुलढाणा येथून चिखली येथे आयोजीत करण्याचे प्रयोजन हे प्रशासकीयदृष्टया सयुक्तीक वाटत नाही. कारण तेवढया प्रकरणाकरीता बुलढाणा येथील वकीलांना चिखली येथे जाणे येणे कोणत्याही दृष्टीने सोयीचे होणार नसून सदर निर्णय घेण्यात येवू नये व तसा निर्णय झाला असल्यास तो रद्द करण्यात यावा.
चिखली विधानसभा मतदार संघातील बहुतांश गावें हे बुलढाणा तालुका तथा सिंदखेडराजा व देऊळगांवराजा तहसील मध्ये समाविष्ट आहेत, तेव्हा सदर कॅम्प चिखली येथे घेणे कोणत्याही अर्थाने हितावह ठरणारे नाही. असे न केल्यास पुन्हा इतर महुसल मंडळी, त्यामुळे मलकापूर, जळगांव जामोद, सिंदखेडराजा येथून सुध्दा अशा प्रकारचे कॅम्पबददल मागणी जोर धरु शकते व तशी मागणी ही प्रशासकीयदृष्टया सोयीची ठरणार नसून बुलढाणा येथील वकील मंडळींना सुध्दा अत्यंत अडचणीचे ठरु शकते. आजपर्यत बुलढाणा मुख्यालयी प्रकरणांमध्ये कोणत्याही प्रकारची प्रशासकीय वा इतर कोणत्याही प्रकारची अडचण आली नसून अत्यंत सुरळीतपणे जिल्हा मुख्यालयी कामकाज पार पडत आहे. तरी तो कॅम्प बुलढाण्यात घेण्यात यावा अशी मागणी केली आहे. या निवेदनावर बुलढाणा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड.विजय सावळे, सचिव अॅड.अमर इंगळे यांच्यासह इतर सदस्यांच्या स्वाक्षर्या आहे.
बुलढाणा बार असोसिएशनच्या वतीने सोमवार दिनांक 2 जून रोजी बुलढाण्यातून चिखलीला कॅम्प घेण्याच्या बाबत एक ठराव घेण्यात आला. यामध्ये चिखली ला महासूल कॅम्प न घेता सर्वांना सोयीच्या असलेल्या बुलढाणा मुख्यालयी कॅम्प घेण्यात यावा असे बार असोसिएशनच्या तातडीच्या बैठकीत ठरविण्यात आले आहे. त्यामुळे याबाबत जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.