मुख्यमंत्री फडणवीसांची सपकाळांवर खोचक टीका… सपकाळ ही म्हणाले, “हाच अहंकार….
बुलढाणा, 1 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यम प्रतिनिधीशी बोलातांना प्रतिक्रिया दिली की, महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात हिंदी सक्तीचे जे दोन जीआर काढले होते. ते राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते ते नागपूरच्या रेशीम बागेतून आले होते.
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देतांना म्हटले की, हर्षवर्धन कोण? सपकाळ? नया है वह… अशी उपहासात्मक प्रतिक्रिया दिली आहे.
यावर हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मिडीयावर पोस्ट केली आहे त्यात त्यांनी म्हटले की, हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा, आणि हो हाच अहंकार होता औरंगजेबाचा! आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे, हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे. आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण सत्यमेव जयते!
आम्ही फडणवीस यांना स्पष्टपणे सांगतो; हो, तो नवा आहे… पण तुमच्यापेक्षा साफ आहे! तो महाराष्ट्राच्या शेतकर्यांतून आलाय, आणि सत्तेच्या नव्हे तर सत्याच्या वाटेवर चालतो! नया है वह – हे विधान म्हणजे नव्या नेतृत्वाची हेटाळणी नव्हे, तर युवाशक्तीचा अपमान आहे !
काँग्रेस पक्ष ही 135 वर्षांची संस्था आहे – विचारांचा वारसा आणि नेतृत्वाची परंपरा असलेली. नवा आहे, पण विचार गांधींचे, तत्व नेहरूंचे आणि निर्धार शिवरायांचा आहे! मोताळा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या विधानाचा तीव्र निषेध करतो -प्रवीण (आप्पा)कदम, तालुका अध्यक्ष, मोताळा तालुका काँग्रेस कमिटी