बुलढाणा, 3 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : बुलढाणा येथील जयस्तंभ चौक येथील नामांकित पेट्रोल पंप मे. हिरोळे पेट्रोलियम यांना नुकतेच औरंगाबाद डिव्हिजन मधील बुलढाणा सेल्स एरिया मध्ये सन 2024-25 मध्ये सर्वाधिक पेट्रोल विक्री आणि हायस्ट वार्षिक पेट्रोल विक्री ग्रोथ करीता सन्मानित करण्यात आले. मे. हिरोळे पेट्रोलियम हे मागील बावीस वर्षांपासून बुलढाणा शहरात निरंतर व निर्विवाद व उत्कृष्ठ सेवा देत असून मागील बावीस वर्षांपासून औरंगाबाद डिव्हिजन मध्ये बुलढाणा सेल्स एरिया मध्ये कायम एक नंबर आहे मे. हिरोळे पेट्रोलियम हे आपली परंपरा व निरंतर व निर्विवाद व उत्कृष्ठ सेवा देत नवीन जोमाने नवीन उचांक गाठण्याकरिता प्रयत्नशील आहे इंडियन ऑइल कंपनी द्वारे उत्कृष्ट पेट्रोल पंप म्हणून सन्मानित करून या पम्पाचा समावेश नवरत्न पंप मध्ये करण्यात आलेला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील यशस्वी युवा उदयोजक व समाजसेवी असलेले डॉ.अर्चित अमोल हिरोळे हे या पम्पाचे मालक असून, यांना जागतिक स्तरावरील धम्म परिषद आणि बिझनेस एक्स्पो च्या पावन सोहळ्यात मुकनायक बुलढाणा हा पुरस्कार देऊन देखील सन्मानित करण्यात करण्यात आले होते.
त्यांनी त्यांच्या नेतृत्वात या पंपाची व मे. हिरोळे ईण्डेन गॅस एजन्सी ची धुरा समर्थपणे सांभाळली असून नवीन उच्चांक गाठण्याकरिता ते नेहमी च प्रयत्नशील असतात.
इंडियन ऑइल औरंगाबाद चे डिव्हिजनल मॅनेजर दीपक सिन्हा, असिस्टंट मॅनेजर विकास जजेरिया, बुलडाणा एरिया सेल्स मॅनेजर शुभम गुप्ता व इतर मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत हॉटेल पुष्पांजली खामगांव येथे आयोजित कार्यक्रमात दिनांक 2 जुलै रोजी डॉ.अर्चित अमोल हिरोळे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला व पुढील यशस्वी वाटचाली करीता त्यांना सर्व मान्यवरांतर्फे शुभेच्या देण्यात आल्या.
डॉ.अर्चित अमोल हिरोळे यांचे नेतृत्वात एकाच वर्षात दोन महत्वाचे पुरस्कार मिळाल्याने हिरोळे परिवारात उत्साहाचे वातावरण असून डॉ.अर्चित अमोल हिरोळे यांनी याचे श्रेय त्यांचे वडील अमोल हिरोळे, पंप कर्मचारी आणि मौल्यवान ग्राहकांनी दाखवलेल्या विश्वास आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले.