spot_img

आषाढी एकादशीच्या निमित्ताने “श्रीं”चे मंदिर शनिवारी रात्रभर खुले

बुलढाणा, 4 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः आषाढी एकादशीच्या निमित्ताने जे भाविक श्री क्षैत्र पंढरपूर येथे जाऊ न शकलेले भाविक विदर्भाचे प्रति पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगाव येथे दर्शन घेण्यासाठी येत असतात भाविकांची गर्दी लक्षात घेता श्री संस्थांच्या वतीने
शनिवार रोजी श्रींचे मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. 6 जुलै रविवार रोजी आषाढी एकादशी निमित्त, मराठवाडा, जळगाव खान्देश, विदर्भातील विविध जिल्ह्यांतील हजारो भाविक श्रींच्या समाधी दर्शनासाठी येतात आषाढी एकादशी निमित्त श्रींच्या मंदिरात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये मंदिरामध्ये काकडा भजन दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व श्रींच्या पालखीची मंदिर परिक्रमा निघणार आहे रात्री 8 ते 10 कीर्तन होणार आहे. श्रींच्या भाविकांसाठी दि.5 जुलैच्या रात्री आणि 6 जुलैला दिवसभर मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतील. दर्शनबारी व श्रीमुख दर्शनबारी, महाप्रसाद, पारायण व्यवस्था केली आहे. तसेच भक्तांच्या सोयीसाठी संस्थानच्या भक्त निवासामध्ये नियमानुसार अल्पदरात राहण्याची व्यवस्था नित्याप्रमाणे सुरू आहे. संपूर्ण मंदिर परिसरात स्वच्छता ही भक्तांना श्रींच्या प्रति आपली आस्था प्रसन्न मनाने एकरूप करणारी आहे.भक्तांना कोणताही त्रास होवू नये यास्तव श्रींचे सेवेकरी आपली सेवा देण्यास तत्पर आहेत. या आषाढी एकादशी उत्सव काळात सर्वतोपरी सोयीसुविधा संस्थानच्यावतीने पुरविल्या जात आहेत.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत