spot_img

खिशातील पैसे व मोबाईल चोरणार्‍या चोरट्यांच्या तीन तासात आवळल्या मुसक्या

चिखली पोलिसांची धडाकेबाज कामगिरी

बुलढाणा, 6 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः खिशातील पैसे व मोबाईल चोरणार्‍या चोरट्यांच्या तीन तासात चिखली पोलिसांनी मुसक्या आवळल्या. AU Small Finance Bank राऊतवाडी शाखा चिखली येथे पत्नीच्या नावावर 49 हजार कर्ज घेतले होते, त्यापैकी 3 हजार रुपये खर्चासाठी तक्रारदार यांनी घेतले व बाकी पैसे पत्नीने तिचे पर्समध्ये ठेवले. सदर 3 हजार रुपये व रियलमी कंपनीचा मोबाईल किंमत 10 हजार रुपये तसेच रियलमी कंपनीचा दुसरा मोबाईल किंमत 8 हजार 500 रुपयांचे दोन मोबाईल फिर्यादी याने शर्टचे वरच्या खिशात ठेवले व गावी जाण्यासाठी बस स्टँडकडे पायी निघाले असता. दुपारी 3.30 वाजताचे सुमारास शिवाजी शाळेच्या गेटजवळ रोडचे विरुध्द दिशेने बस स्टँडकडे जातांना पाठीमागुन एक प्रवाशी अ‍ॅटो आला. सदर अ‍ॅटोत 1 चालक व 1 मागे बसलेला असे 2 अनोळखी इसम दिसले. अ‍ॅटो चालकाने समोरुन अ‍ॅटो टर्न मारुन आडवा लावला व अ‍ॅटोत मागे बसलेल्या इसमाने खाली उतरुन गळा दाबुन आवाज केला तर तुला इथेच मारुन टाकीन असे म्हणुन वरच्या खिशातील 3 हजार व 18 हजार 500 रुपये किंमतीचे 2 मोबाईल जबरीने काढुन ते खामगाव चौफुलीचे दिशेने अ‍ॅटो घेऊन निघुन गेले होते. याप्रकरणी चिखली पोलिस स्टेशनला 5 जुलै रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे संबंधाने ठाणेदार संग्राम पाटील यांनी पोलीस स्टेशनचे डि.बी. पथक यांना गुन्हयासंदर्भाने सखोल तपास करणे व आरोपी याचा तात्काळ शोधण्यासाठी सुचना दिल्या त्यानुसार डि.बी. पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे गांभीर्य पाहता मिळालेल्या माहितीनुसार आरोपी हे बुलडाण्याचे असल्याबाबत खात्रीशीर माहिती मिळवली. गुन्हयात वापरण्यात आलेली अ‍ॅटो तसेच आरोपी यांचा शोध घेवुन आरोपी शेख नुमान शेख शकील रा बुलडाणा, फैजान खान नईम खान रा बुलडाणा हे पळुन जाण्याच्या बेतात असताना शिताफिने ताब्यात घेवुन त्याना विश्वासाने सदर गुन्हयाबबात विचारपुस केली असता दोघानी 4 जुलै रोजी सदरचा गुन्हा त्यांनीच केला असल्याबाबत कबुली दिल्याने त्यांचेकडुन चोरीस गेलेले 2 मोबाईल किमती 18 हजार 500 रुपये व नगदी 1 हजार 760 रुपये रोख रक्कम तसेच चोरीच्या गुन्ह्यासाठी वापरलेला ऑटो किंमत 80 हजार रूपये असा एकुण 1 लाख 260 रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करुन सदर गुन्हयात आरोपी यांना अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता त्याना न्यायालयाने त्यांची जेलमध्ये रवानगी केली आहे.
सदरची कार्यवाही चिखली पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील, डि.बी.पथकाचे पोउपनि समाधान वडणे, सफौ राजेंद्र काळे, पोना अमोल गवई, पोकों प्रशांत धंदर, पोकॉ अजय इटावा, पंढरीनाथ मिसाळ, निलेश सावळे, राहुल पायघन, मपोकॉ रुपाली उगले पोलीस स्टेशन चिखली यांनी केली आहे्.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत