बुलढाणा, 11 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः देशभरातील न्यूज चॅनलवर चर्चेचा मुद्दा बनलेले आ. संजय गायकवाड यांच्यावर अखेर गुन्हा दाखल झाला आहे. अर्थात सदर गुन्हा अदखलपात्र आहे. विशेष म्हणजे यात पोलिस फिर्यादी झाले आहेत. यात शंका नाही की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतरच पोलिसांनी हालचाली केल्या आणि आ.गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर प्रकारावर नाराजी व्यक्त केली होती. अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रतिक्रिया देतांना आ. गायकवाड यांनी हिंदीतून एक वाक्य म्हटले की,‘मेरा रास्ता गलत था लेकिन मेरी मंजील सही थी’. ‘अनेकदा तक्रारी देवूनही जर कुुणी सुधारत नसेल तर त्याला याच भाषेत उत्तर देणे योग्य असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
मंगळवारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आकाशवाणी आमदार निवास येथील कॅन्टीनमधील कर्मचार्याला मारहाण केली होती. खराब जेवण दिल्याचा आरोप करत त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचार्याला मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधकांकडून सुरू होती.
आता या प्रकरणात मोठी बातमी समोर आली आहे ती म्हणजे या प्रकरणात संजय गायकवाड यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली आहे. गायकवाड यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरिन ड्राईव्ह पोलिसांकडून अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमदार संजय गायकवाड आणि आणखी एका व्यक्तीच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. ही व्यक्ती अर्थातच घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत उपस्थित समाजमाध्यमातील व्हिडिओ आणि पोलीस कर्मचार्याच्या तक्रारीच्या आधारावर अदलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान आता या गुन्ह्याची माहिती पोलिसांकडून विधानसभा अध्यक्षांना कळवली जाणार आहे. सेक्शन 352, 115 (2) अंतर्गत एनसी दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आता या प्रकरणावर गायकवाड यांची पहिली प्रतिक्रिया देखील समोर आली आहे.
नेमकं काय म्हणाले गायकवाड? ः कुणी सभागृहात मुद्दा उपस्थित केला, तर मुख्यमंत्र्यांना विधानसभेच्या नियमाप्रमाणे बोलावं लागतं . त्यांनी त्यांचं कर्तव्य पार पाडलं, आम्ही काय फार मोठे काम केले नाही, की ज्यामुळे सरकार अडचणीत येईल. अशा अदखलपात्र गुन्ह्यात पोलिसांना फिर्यादी होता येत नाही. विरोधकांच्या समाधानासाठी मुख्यमंत्र्यांनी ते करायला सांगितलं असेल. मला पश्चाताप नाही . शिंदे साहेब मला फोनवर बोलले, राग कट्रोल करण्याचा सल्ला त्यांनी मला दिला असं यावेळी गायकवाड यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय आहे प्रकरण? ः मंगळवारी आमदार निवासमधील कॅन्टीनमध्ये जोरदार राडा झाला होता, संजय गायकवाड यांनी जेवनाची ऑर्डर दिली होती, मात्र त्यातील दाळीला वास येत होता, भात शिळा होता असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर त्यांनी कॅन्टीनमधील कर्मचार्याला मारहाण केली.