spot_img

बुलढाण्यात दुचाकींची समोरासमोर धडक : तीन जण गंभीर जखमी

बुलढाणा, 13 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : चिखली रोडवर होमगार्ड ऑफिस जवळ दोन दुचाकीच्या आमोरासमोर झालेल्या धडकेत तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. थोड्यावेळापूर्वी रात्री दहा वाजेच्या दरम्यान हा अपघात घडला. तीनही जखमींना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यातील एक एसटी बसचा कंडक्टर असल्याचे कळते तर इतर दोघे कन्नड तालुक्यातील आहेत.

गुड इव्हिनिंग सिटीला मिळालेल्या माहितीनुसार प्लेटिना आणि शाईन या दोन दुचाकींमध्ये हा अपघात घडला. इथापे लेआउट मध्ये राहणारे प्रमोद खरे शाईन गाडीवरून घराकडे जात होते. त्यांना समोरून येणाऱ्या प्लेटिना गाडीने धडक दिली. प्लेटिना गाडीवर सतीश बावस्कर आणि समाधान चिकणे हे दोघेजण (रा. टाकळी, ता. कन्नड) स्वार होते. अपघातानंतर दोन्ही गाड्या रस्त्याच्या बाजूला फेकल्या गेल्या. त्यात प्रमोद खरे रक्तबंबाळ झाले. तर सतीश बावस्कर यांच्या कानातून रक्त निघत होते. खरे यांच्या उजव्या पायाला मोठा मार लागला आहे. समाधान चिकणे हे सुद्धा जखमी झाले आहेत. प्रसाद गडाख या ऑटोचालकाने माणुसकी दाखवत जखमी अवस्थेतील प्रमोद खरे यांना तात्काळ सामान्य रुग्णालयांमध्ये भरती केले. तिघांवरही उपचार सुरू असून जे गंभीर आहेत त्यांना संभाजीनगर या ठिकाणी पुढील उपचारासाठी पाठविण्यात येणार असल्याचे कळते. वृत्त लिहीपर्यंत या संदर्भात पोलिसांकडे सदर अपघाताची कुठलीही नोंद नव्हती.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत