बुलढाणा, 17 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः सातगाव म्ह. येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रातील रणजीतसिंग उत्तमसिंग राजपूत यांची शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या बुलढाणा तालुका समन्वयक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. राजपूत यांचे वडील पेशाने शिक्षक होते, मात्र त्यांच्यावर त्यांच्या काका, स्व. डॉ. उमरावसिंग राजपूत यांच्या राजकीय कार्याचा प्रभाव होता. त्यांनी हेच व्रत पुढे चालवत ग्रामपंचायत सातगाव म्ह .येथे दोन वेळा उपसरपंचपदाची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. सामाजिक व राजकीय कार्याची परंपरा पुढे नेत, त्यांच्या पत्नी नम्रताताई राजपूत यांनी सन 2015 ते 2020 या कालावधीत ग्रामपंचायत सरपंच पदाचा कार्यभार यशस्वीरित्या सांभाळला. रणजीतसिंग राजपूत यांच्ी तालुका समन्वय पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.
गुड इव्हिनिंग सिटीचे प्रकाशक यांचेही नांव रणजीतसिंग राजपूत असल्यामुळे काहींनी त्यांना कॉल करून शुभेच्छा दिल्या. पण राजकारणाशी केवळ पत्रकारितेपुरता संबंध असून कुठल्याही पक्षाशी दुरदूरपर्यंत संबंध नसल्याचे पत्रकार रणजीतसिंग राजपूत यांनी स्पष्ट केले आहे.