मोताळा तालुक्यात “त्या” सावकारावर धाड !!
बुलढाणा, 17 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः मोताळा तालुक्यातील जयपुर येथील अवैध सावकाराच्या घरी सहकार विभागाची धाड अवैध सावकाराचे धाबे दनानले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलढाणा यांच्या आदेशाने जी. जे. आमले, सहायक निबंधक, सहकारी संस्था तालुका मोताळा यांच्या पथकाने आज दिनांक 17 जुलै रोजी विभागास प्राप्त तक्रारीनुसार मोताळा तालुक्यातील जयपूर गावातील संदीप विनायकराव देशमुख रा.जयपूर यांच्या राहत्या घरी अवैध सावकारी अनुषंगाने धाड टाकण्यात आली. सदर धाड अवैध सावकारी व्यवहारांतर्गत जिल्हा निबंधक (सावकरी) तथा जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था बुलढाणा यांच्याकडे दाखल केलेल्या तक्रारीच्या चौकशी करिता दिनांक 17 जुलै रोजी सकाळी वेळ 9.20 वा वाजता प्राप्त तक्रारीतील प्रकरणातील अवैध सावकार यांचे राहते घरी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 चे कलम 16 अंतर्गत झाझाझडती कारवाईसाठी उक्त पंचा समक्ष धाड टाकण्यात आली. संदीप विनायकराव देशमुख घरी संयुक्त पथकाने अवैध सावकाराबाबत झडतीची कारवाई केली. सदर कारवाई मध्ये घरातील झाडाझडतीमध्ये कोरे बॉण्ड, तसेच विविध प्रकारचे विविध बँकेचे, विविध व्यक्तींचे एकूण 61 प्रकरचे सही केलेले कोरे चेक आढळून आले, त्याप्रमाणे एक वही आढळून आली आहे की ज्या मध्ये अवैध सावकारी संबंधाने नोंदी निदर्शनास आलेल्या आहेत, तसेच झाडाझडती दरम्यान एकूण पाच प्रकारचे वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आढळून आले. सदर मोबाईल अवैध सावकाराच्या घरी कशा कारणाने आले याचा खुलासा ते करू शकले नाही. त्यामुळे सदर मोबाईल पुढील तपासाकरिता जप्त करण्यात आले. सहकारी विभागाच्या पथकाच्या अवैध सावकाराच्या झाडाझडतीमध्ये मिळालेले सर्व दस्तऐवज पुढील तपासा करिता जप्त करण्यात आले आहे. सहकार विभागाच्या सावकारी धाडी मध्ये पथक प्रमुख जी. जे. आमले, सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था तालुका मोताळा, पथक सहाय्यक यु. के. सुरडकर एस. के. घाटे, वाय एम घुसळकर, आर. ए. डहाके, एन एस सोनवणे, पी. व्ही. किकराळे, तसेच पंच म्हणून तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी सदानंद हिवाळे, आणि गोपाल सिंग राजपूत, महसूल अधिकारी, तसेच जिल्हा पोलीस दलातील पो काँ मोहिनी हावरे,पोशी रामप्रसाद डोळे आदी कर्मचारी यांनी पार पाडली.
अवैध सावकारीच्या अनुषंगाने अधिक पिळवणुक करणा-या अवैध सावकारांच्या तक्रारी सबळ पुराव्यासह प्राप्त झाल्यास अशा सावकारांवर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार चौकशी करुन अवैध सवाकारी सिध्द झाल्सास फौजदारी स्वरुपाची कारवाही करण्यात येते. या संदर्भात जिल्हा निबंधक, (सावकारी) बुलडाणा या कर्यालयाशी संपर्क साधावा.
– जी.जे. आमले
सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था बुलडाणा,