spot_img

बाईसोबत नाही.. विद्युत मीटरसोबत झाली होती छेडछाड !

चिखली विनयभंग प्रकरणात टवीस्ट; भरारी पथकाने केली वीज चोरी उघड

बुलढाणा, 22 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः विद्युत अभियंत्याने छेडखानी केल्याप्रकरणी चिखली पोलिसांत दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाला आहे. पण या प्रकरणात आरोप करणार्‍या कुटुंबाने विद्युत मिटरसोबत छेडछाड करून मोठी विजचोरी केली असल्याचा खुलासा महावितरणच्या भरारी पथकाने केला आहे. विशेष म्हणजे, ज्याच्या पत्नीने विनयभंगाची तक्रार दिली आहे, त्या सदर व्यक्तीविरोधात त्याच तारखेला बुलढाणा पोलीस स्टेशनला विजचोरीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे वीजचोरीचे प्रकरण दाबण्यासाठीच विनयभंगाचे खोटे प्रकरण दाखल केल्याचे भरारी पथकाचे म्हणणे आहे.
विद्युत वितरण कंपनीच्या फिरत्या पथकाने चिखली येथील बी-राम सेल्सच्या मागे जालना रोड, येथे 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजेच्या दरम्यान धाड टाकली. पथकाने घरातील विद्युत मिटरची तपासणी केली असता मिटरमध्ये छेडछाड करुन 48 हजार 230 रुपयांची वीजचोरी केल्याची बाब आढळून आली. याप्रकरणी फिरते पथक कार्यकारी अभियंता यांच्या फिर्यादीवरुन बुलढाणा शहर पोलिसांत भगवान काळे यांच्यावर गुन्हा दखल करण्यात आला आहे.
विद्युत कंपनी बुलढाणा अतिरीक्त कार्यकारी अभियंता फिरते पथक प्रशांत कलोरे यांनी बुलढाणा शहर पोलिसांत फिर्याद दिली की, 17 जुलै रोजी दुपारी 2 वाजता भगवान रामेश्वर काळे यांच्या घर राम सेल्सच्या मागे, जालना रोड चिखली येथे मिटरची तपासणी करण्यासाठी त्यांच्या पथकातील सहाय्यक सुवअं.अशिष सुनिल देशमुख, तंत्रज्ञ समाधान रा.गायकवाड, गजानन श्रीराम पाटील गेले. तेथील वीज वापरकर्त्यां यांना परिचय देवून मिटरची तपासणी करायची असे सांगून मिटरची तपासणी केली.तपासणी दरम्यान, मिटर संथगतीने फिरतांना आढळून आले. मिटर वापरकर्त्या यांच्या समक्ष भिंतीवरुन उतरवून वीज वापरकर्त्या यांच्या समक्ष तपासले असता मिटर बॉडी व बॉडी सील संशयास्पद तसेच मिटर बॉडीला मागच्या बाजुने बुजविलेले छिद्र आढळले. मिटर न उघडता तपासले असता शंट डिव्हायडर स्ट्रिपची वायर मुळ जागेवरुन कट करुन दुसर्‍या ठिकाणी रिसोल्ड केलेली आढळली. तसेच न्युट्रल सिटीची नळी वायर कट केलेली आढळली. मिटरशी छेडछाड करीत मागील 12 महिन्यापासून विद्युत वितरण कंपनीच्या 1964 युनिटची 48 हजार 230 रुपयांची वीजचोरी केल्याच्या फिर्यादीवरुन बुलढाणा शहर पोलिसांनी भगवान काळे यांच्यावर भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) 2003 कलम 135 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर मिटरचा पंचासमक्ष घटनास्थळ पंचनामा तयार करुन मिटरला कागदी सिलवर फिरते पथक अधिकारी व पंच यांच्या स्वाक्षरीने मिटरला चिटकवून पुढील कार्यवाहीकरीता जप्त करण्यात आले. पुढील तपास बुलढाणा शहर पोलिस करीत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत