spot_img

“श्री”च्या पालखीची 30 जुलै रोजी खामगावात नगर परिक्रमा

खामगांव, 23 जुलै (गुड इव्हीनींग सिटी / डी टी तायडे): आषाढी एकादशी निमित्त श्री विठ्ठलाचे दर्शनासाठी पंढरपूर येथे गेलेली श्री गजानन महाराज संस्थान शेगावच्या पालखीचे परतीच्या प्रवासात बुधवार 30 जुलै रोजी शहरात आगमन होत आहे. आज 23 जुलै रोजी श्रींच्या पालखीचे मातृतीर्थ सिंदखेड राजा तालुक्यात आगमन झाले आहे. 24 जुलै बीबी, 25 जुलै, लोणार, 26 जुलै मेहकर, 27 जुलै जानेफळ, 28 जुलै शिर्ला नेमाने, 29 जुलै आवर त्यानंतर 30 जुलै रोजी खामगावात आगमन होणार आहे. खामगाव तालुक्यातील आवार येथील मुक्काम आटोपून टेंभुर्णा मार्गे सकाळी हनुमान व्हिटॅमिन येथे पालखी दाखल होणार असुन विश्रांतीनंतर सकाळी 11 वाजता नगर परिक्रमेला प्रारंभ होईल. श्रींची पालखी शहरातील वाल्मीक चौक, विकमसी चौक, कृषी उत्पन्न संत गजानन महाराज बाजार समिती, टिळक पुतळा, अर्जुन जल मंदीर, मेन रोड, जगदंबा चौक, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, महावीर भवन, एच.डी.एफ.सी. बँक, खामगाव अर्बन बँकेसमोरून श्री अरजण खिमजी नॅशनल हायस्कूल चे प्रांगणात दुपारी 3 वाजता चे सुमारास पोहचेल. याठिकाणी भाविकांच्या दर्शनाकरिता पालखी मुक्कामी राहील. दुसर्‍या दिवशी गुरूवार 31 जुलै रोजी पहाटे 5 वाजता श्रींची पालखी अग्रसेन चौक, कमान गेट, शहर पोलीस स्टेशन, आयकर भवन, बस स्टॅन्ड, सामान्य रुग्णालय समोरून शेगावकडे भाविकांनी श्रींच्या दर्शनाचा लाभघ्यावा, असे आवाहन श्री गजानन अवलिया महाराज भक्त मंडळ सुटाळपूरा खामगाव यांनी केले आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत