बुलढाणा, 27 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) ः जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून कुठे संततधार तर कुठे मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. हवामान खात्याने जिल्ह्याला येलो अर्लट ची चेतावणी दिली आहे. पावसामुळे घाटावरील 12 प्रकल्प 100% भरले आहे. प्रकल्पामधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीकाठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सर्तकतेचा इशारा दिला आहे. कळपविहीर प्रकल्प मेहकर हा 26 जुलैच्या संध्याकाळी 5 वाजता 100% भरला आहे. त्यामुळे धानोरा, शिवानी पिसा, राजनी, गुंजापूर व कळपविहीर या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. लोणार तालुक्यातील गंधारी प्रकल्प 100% भरला आहे. त्यामुळे नदीकाठावरील सावरगाव मुंढे या गावाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
खळेगाव प्रकल्प 100% आहे त्यामुळे खळेगाव, महारचिकाना, अंजनी बु. या गावांना सर्तकतेचा इशारा दिला आहे.
खंडळा प्रकल्प 100% भरला असल्यामुळे किंनगाव जटू, सावरगाव तेली गावाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
बिबखेड प्रकल्प ही 100% भरला असल्यामुळे बिबखेड गावाला सर्तकतेचा इशारा दिला आहे. अंचरवाडी प्रकल्प 100% भरला असल्यामुळे अंचरवाडी गावाला सर्तकतेचा इशारा दिला आहे.
वर्दडी प्रकल्प पूर्ण भरला असल्यामुळे वर्दडी गावाला सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.
पेनटाकळी प्रकल्पात 72% पाणीसाठा आहे. पाण्याचा ओघ सुरू असल्यामुळे पाण्याच्या पातळीत वाढ होत आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची प्रकिया करण्यात येईल असा इशारा पेनटाकळी प्रकल्प पूर नियंत्रण कक्षाने दिला आहे.