◾ एक्झिक्यूटिव्ह एमबीएच्या दुहेरी पदवीचा सन्मान
बुलढाणा, 28 जुलै (गुड इव्हिनिंग सिटी) : जगातील क्रमांक 19 व्या विद्यापीठातून वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी सेंट लुईस आणि भारतातील क्रमांक 1 च्या आय आय टी मुंबई या संस्थेतून बुलढाण्यातील आनंद गजानन भारती यांनी एक्झिक्यूटिव्ह एमबीए ही दुहेरी पदवी यशस्वीपणे पूर्ण केली आहे. या अत्यंत प्रतिष्ठित आणि आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमासाठी त्यांनी सिडनी (ऑस्ट्रेलिया) येवून मुंबई व वॉशिंग्टन DC दरम्यान वारंवार प्रवास केला. हे त्यांच्या परिश्रम, समर्पण आणि शिक्षणाविषयीच्या निष्ठेचं ज्वलंत उदाहरण आहे.सध्या ते DuxXel Pty Ltd या स्वतःच्या आयटी कंपनीचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी (Founder and CEO) म्हणून कार्यरत असून, ही कंपनी सिडनी, ऑस्ट्रेलिया येथे स्थित आहे. सध्या DuxXel कंपनीचे कार्य ऑस्ट्रेलिया आणि भारत या देशांमध्ये विस्तारले आहे.आ
नंद भारती हे गजानन गोपाळ भारती, (मुख्य सांखिकी अधिकारी महाराष्ट्र एस टी महामंडळ सेवानिवृत्त) यांचे सुपुत्र आहेत, जे बुलढाणा, येथे स्थायिक असून, प्रसिद्ध S2K शोरूमचे मालक देखील आहेत.त्यांच्या या जागतिक स्तरावरील यशामुळे संपूर्ण समाजबांधव, मित्रपरिवार आणि कुटुंबीयांकडून त्यांच्यावर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या पुढील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!