spot_img

बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळात बुलढाण्याचे संदीप राऊत यांची वर्णी

बुलढाणा, 2 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः  बालभारतीच्या पाठ्यपुस्तक मंडळात बुलढाण्याचे संदीप राऊत यांची वर्णी लागली आहे. नविन अभ्यासक्रमाचे बालभारती पाठयपुस्तक समीक्षणासाठी संदीप विष्णू राऊत यांची निवड झाली आहे. संदीप राऊत हे चिखली पंचायत समिती अंतर्गत ग्राम हातणी येथील जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक म्हणून कार्यरत आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे, बालभारती च्या माध्यमातून शैक्षिणक पाठ्यपुस्तक दिले जातात. बुलढाण्याचे संदीप राऊत यांची गणित इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तक समिक्षण सत्रासाठी निवड झाली आहे. त्यांना बालभारती, गणित चे विशेषधिकारी बाळकृष्ण मापरी यांनी 24 जुलै रोजी एका पत्राव्दारे जाहीर केले आहे. बालभारतीकडून देण्यात आलेल्या पत्रात नमूद आहे की, पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 वर आधारित गणित इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तक निर्मितीचे काम पाठ्यपुस्तक मंडळाने हाती घेतले आहे. गणित विषय समितीने प्रस्तुत पाठ्यपुस्तकाची मसुदा प्रत तयार केलेली आहे. या पाठ्यपुस्तकाला अंतिम स्वरूप देण्यापूर्वी याबाबत आपले अभिप्राय घेणे आवश्यक आहे. याबाबत दिनांक 31 जुलै 2025 व दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी समीक्षण सत्र आयोजित केले आहे. प्रस्तुत समीक्षण सत्रात गणित विषय इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तकाचा मसुदा आपणांस अभिप्राय नोंदवण्यासाठी देण्यात येईल. आपणाकडून प्राप्त होणार्‍या सूचना व अभिप्राय यांचा योग्य तो विचार करून पाठ्यपुस्तकास अंतिम स्वरूप दिले जाईल.
संदीप राऊत यंाची बालभारतीच्या गणित इयत्ता दुसरीच्या पाठ्यपुस्तक समिक्षण सत्रासाठी निवड झाल्याबद्दल हे बुलढाणा जिल्ह्यासाठी आनंदाचा व अभिमानाची गोष्ट असल्याची भावना अनेक मान्यवरांनी व्यक्त केली आहे. निवडीबद्दल संदीप राऊत यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.

https://chat.whatsapp.com/Efmfst9caByBqCezG7bfylspot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहेत