बुलढाणा, 4 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) : वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजीओथेरपी, बुलडाणा कडून संत गजानन महाराजांच्या पालखीसोबत शेगावच्या दिशेने पायी निघालेल्या लाखो भक्तांच्या सेवेसाठी मोफत भौतिकोपचार शिबीर संपन्न. हि दिंडी खामगाव मधून सकाळी ६ वाजता निघून शेगाव येथे पोहचली. खामगाव शेगाव रस्त्यावरील लासुरा फाट्याजवळ ह्या शिबिराचे आयोजन केले होते. दिंडी सोबत पाई जाणाऱ्या वारकर्यांसाठी या मोफत शिबीराचे आयोजन केले गेले होते. या शीबिरामध्ये 8५० हून अधिक वारकर्यांनी भाग घेतला होता. ज्या वारकऱ्यांचे हात, पाय, कंबर, मान, गुडघे, खांदे, टाचा दुखत होत्या अशा वारकऱ्यांवर भौतिकोपचार तज्ञांकडून मोफत भौतिकोपचार करण्यात आले. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये समाधान दिसून आले. या शिबिरात वसंतप्रभा आरोग्य सेवा प्रतिष्ठान, बुलडाणा चे अध्यक्ष डॉ. शोन चिंचोले यांच्या मार्गदर्शनाखाली भौतिकोपचार सेवेचा उपक्रम राबविण्यात आला. या शिबिराची संपूर्ण व्यवस्था वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, बुलडाणा च्या प्राचार्य डॉ. अस्मिता मोहरकर यांच्या सूचनेनुसार करण्यात आली. हि सेवा देण्यामध्ये डॉ. अस्मिता मोहरकर, डॉ. रुपाली व्यव्हारे, डॉ. सायली दारमोडे, डॉ. नितीका चव्हान, डॉ. प्रतिक जयस्वाल, संदेश सरदार हे शिक्षक तसेच गौरव भापकर, संतोष घोंगडे, रेणुका नाले, तेजस बिरभाऊ, विष्णू जाधव, प्रियंका बिबे आणि अभिषेक तायडे इत्यादी विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वारकर्यांची सेवा केली. अशाप्रकारचा उपक्रम प्रथमच वसंतप्रभा कॉलेज ऑफ फिजिओथेरपी तर्फे राबविण्यात आला. वारकर्यांची सेवा म्हणजेच गजानन महाराजांची सेवा हा दृष्टीकोन समोर ठेऊन अशाप्रकारची सेवा करण्यास अनुभूती मिळाली.
या शिबिरामध्ये डॉ. अजित शिरसाट आय एम ए अध्यक्ष, डॉ. गणेश महाले, डॉ. मधुकर देवकर, श्री राहुल राऊत व श्री तुषार सावजी यांनी देखील शिबिरास भेट देऊन त्या सेवेचा लाभ घेतला.