बुलढाणा, 5 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः मुलीला फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी आरोपी विरोधात पोक्सो दाखल करण्यात आला आहे. बुलढाणा तालुक्यातील एका गावात 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस सुधाकर गजानन निकम रा.भादोला याने फुस लावून पळवून नेले होते. त्याला बुलढाणा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलीच्या आजीची तब्येत बरी नसल्यामुळे तिला तिच्या आजीकडे मे महिन्यात पाठविण्यात आले होते. 8 जून रोजी आजीच्या गावातील लग्न हे तिच्या मुळ गावी लागण्यासाठी जाणार होते. त्यामुळे तिच्या आजीला फोनवर सांगितले की, वर्हाडासोबत तिला पाठवून द्या. पण ती त्या वर्हाडासोबत आली नाही. त्यामुळे आजीकडे विचारणा केली असता आजीने सांगितले की, ती तिच्या आत्याच्या घरी 6 जून रोजी सायंकाळी 6 वाजता निघून गेली. मोबाईल नसल्यामुळे संपर्क करता आला नाही. मुलीच्या काकांनी सर्वत्र फोन केले परंतू ती कोणत्याच नातेवाईकाकडे मिळून आली नाही. त्यामुळे तिच्या काकाने बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशन मध्ये 10 जून रोजी अज्ञात आरोपी विरूध्द फुस लावून पळवून नेल्याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. तपासामध्ये सुधाकर निकम याने मुलीला फुस लावून पळून नेल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सहाय्यक पोलिस निरिक्षक शरद माळी यांनी आरोपीला अटक केली. सुधाकर निकम वर बुलढाणा ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये कलम 137(2), बीएनएस सह 64(2),(एफ), (एम), पोक्से कलम 4,5(एल) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणाचा पुढील तपास बुलढाणा ग्रामीण पोलिस करीत आहे.