दिगंबर कपाटे यांनी आरोपीचा केला सिनेस्टाईल पाठलाग
बुलढाणा, 6 ऑगस्ट (गुड इव्हिनिंग सिटी) ः देऊळगाव राजात एलसीबीच्या पथकाने घरफोडी, ज्वेलर्स व मोटारसायकल चोरी प्रकरणातील सराईत 3 आरोपींना अटक केली आहे. हेकाँ दिगंबर कपाटे यांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलग करत ताब्यात घेतले. एसपी निलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली सुनिल अंबुलकर पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांचे आदेशाने 5 ऑगस्ट रोजी पोलीस स्टेशन देउळगांव राजा येथे पेट्रोलींग करत असतांना गोपनिय माहितीच्या आधारे खात्रीलायक खबर मिळाली की, रेकॉर्डवरील आरोपी नामे हिरासिंग बावरी रा. देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा याने त्याचे साथीदारांसह बुलढाणा जिल्हयामध्ये ज्वेलर्स चे दुकान, घरफोडी, मोटार सायकल चोरीचे गुन्हे केले आहे. अशा मिळालेल्या खात्रीलायक खबरे वरुन हिरासिंग बावरी याचा देऊळगांव राजा शहरामध्ये शोध घेतला असता तो सरकारी दवाखाना जवळ दिसला असता तो पोलिसांना पाहून पळून जाताना दिगंबर कपाटे यांनी त्याचा पाठलाग करून गीतांजली टॉकीज समोरील नंदन एजन्सी समोर हिरासिंग मोहनसिंग बावरी वय 20 वर्ष, यास पकडले नमुद इसमास विश्वासात घेवुन पंचासमक्ष बुलढाणा जिल्हयातील ज्वेलर्सचे दुकानातील चोरी, घरफोडी, मो.सा चोरी इत्यादी बाबत सखोल विचारपुस केली असता त्याने पंचासमक्ष त्यांचे साथीदारांसह खालील प्रमाणं गुन्हें केले असल्याचे सांगीतले. मेहकर पोलिस स्टेशनमध्ये कलम 305 (अ), 334 (1) बी.एन.एस., 174/2025 कलम 305 (अ), 334 (1) बी.एन.एस., देऊळगाव राजा पोलिस स्टेशनमध्ये कलम 334 (1), 62 बी.एन.एस., अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्या वर दाखल आहे. 11 जून रोजीच्या रात्री गुन्हा करते वेळी सोबत संतनामसिंग ऊर्फ अजयसिंग चंदासिग बावरे रा देऊळगांव राजा, तकदिरसिंग टिटुसिग रा. जालना, रोशनसिंग बबलुसिंग टाक रा. संजय नगर दे. राजा, धर्मदरसिंग टाक रा. बीबी, जोगीदरसिग रणजितसिंग टाक रा. वसमत यांनी गुन्हे केल्याचे त्याने सांगीतले त्यास घरफोडया मोटार सायकल चोरी बाबत विचारपुस केली असता तो तीन मोटरसायकल व इतर घरफोड्या साथीदारासह केल्या असल्याचे सांगत आहे. गुन्हयामध्ये आरोपी हिरासिंग मोहनसिग बावरी वय 20 वर्ष, रा सरकारी दवाखान्याचे मागे देऊळगाव राजा, संतनामसिंग ऊर्फ अजयसिंग चंदासिग बावरे वय 38 वर्ष रा देऊळगांवराजा, रोशनसिंग बबलुसिंग टाक वय 20 वर्ष रा.संजय नगर दे. राजा या तिन्ही आरोपींना मेहकर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कारवाई पीएसआय प्रताप बाजड, पीएसआय अविनाश जायभाये, एएसआय ओमप्रकाश सावळे, हेकाँ दिगंबर कपाटे, शरद गिरी, पुरुषोत्तम आघाव, एलएचसी वनिता शिगणे, पोकाँ दिपक वायाळ,हेकाँ विकास देशमुख यांच्या पथकाने कारवाई केली आहे.